
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वा नाना पटोलेंचं (Nana Patole) मोदींबद्दल (Pm Modi) केलेलं एक वक्तव्य चांगलेच चर्चेत होते. वाद पेटल्यानंतर मी मोदींना मारेन म्हटलं नव्हतं, मोदी नावाच्या गावगुंडाला मारेन असे स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलेले. मात्र त्या व्हिडिओनंतर भाजपने आक्रमक होत नाना पटोलेंविरोधात राज्यभर आंदोलन केली. यावेळी भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी नाना पटोलेंचा एकेरी उल्लेख करत बोट झाटीन असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य पुन्हा वादात सापडले होते. आता त्याच वक्तव्यावरून बोंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसची लिगल टीम आता मैदानात उतरली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल भाजपा नेते माजी कृषी मंत्री आमदार अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे, भाजपा युवा मोर्चा जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची दखल माझगाव महानगर दंडाधिकारी यांनी घेतली आहे.
नाना पटोलेंबद्दल वादग्रस्त विधान भोवणार?
या प्रकरणाचा आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावे असे न्यायालयाने म्हटले आहे. अमरावती येथे 18 जानेवारीला एका आंदोलात सहभाग घेऊन माजी मंत्री अनिल बोंडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरली. अनिल बोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकावणे, अवमानकरक टिपण्णी करणे, कटकारस्थान रचने, समाजात तेढ निर्माण करणे, दोन गटात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण करणे, मानहानी करणे, सामाजिक शांतता भंग करणे तसेच कोरोना साथ व प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महारष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. रविप्रकाश जाधव यांनी माझगाव न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश
हे प्रकरण राज्यात अनेक दिवस गाजत होते. नाना पटोलेंनी माफी मागवी अशी मागणीही भाजपने केली होती. तसेच नाना पटोलेंविरोधात अनेक ठिकाणी भाजपकडून तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र बोंडेंच्या या वक्तव्यांतर काँग्रेसनेही बोडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत महानगर दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक आझाद मैदान पोलीस स्टेशन यांना कलम 152, 1552 अ, 151 ब 188, 220 बी, 269, 270, 271, 341, 500, 504, 505(ii), 506, 34 कलम, भारतीय दंडसंहितेनुसार माजी मंत्री अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे व भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांची चौकशी करुन 23 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
एसटीचा संप राजकारणामुळे विस्कटला, मराठा आरक्षणाच्या उपोषणात राजकारण नको – प्रवीण दरेकर
शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या का नाही?; चंद्रकांत पाटलांचा सवाल