कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आयोगाच्या स्थापनेचा निर्णय, अशोक चव्हाण यांचं संभाजी छत्रपतींच्या वक्तव्यावर उत्तर

अशोक चव्हाण यांनी संभाजी छत्रपती यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. अशोक चव्हाण नांदेडमध्ये बोलत होते.

कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आयोगाच्या स्थापनेचा निर्णय, अशोक चव्हाण यांचं संभाजी छत्रपतींच्या वक्तव्यावर उत्तर
अशोक चव्हाण Image Credit source: Ashok Chavan : Twitter
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 3:48 PM

नांदेड : मराठा आरक्षण (Maratha Reservation ) आणि इतर मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी आज आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. खासदार संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेतली होती. त्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यावर, संभाजी छत्रपती यांनी एक मागासवर्ग आयोग असतानाच दुसरा आयोग कशाला? असा सवाल करत उगाच दिशाभूल करू नका, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी संभाजी छत्रपती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठा आयोग आणि सवलतीच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. याचा फायदा मराठा समाजाला नक्की होईल, असा आशावाद चव्हाण यांनी व्यक्त केला. चव्हाण आज नांदेड मध्ये बोलत होते.

राज्य सरकारनं कोणताही शब्द फिरवला नाही

मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यसरकारने कुठलाही शब्द फिरवला नाही. शासनाने काही केलं नाही हे म्हणंन चुकीच आहे, अशी प्रतिक्रिया मराठा उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आरक्षणाच्या बाबतीत सरकारने एक ही निर्णय घेतला नाही, सरकारने शब्द फिरवला असल्याची टीका संभाजी छत्रपती यांनी केली होती. अशोक चव्हाण यांनी त्यावर ही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी संपर्क करत आहेत. मात्र, शासनाने काही केलं नाही असं म्हणनं चुकीचं आहे, असं वक्तव्य ही अशोक चव्हाण यांनी केलयं.

संभाजी छत्रपती नेमकं काय म्हणाले?

खासदार संभाजी छत्रपती यांनी सरकारच्या या नव्या मागासवर्ग आयोगाला विरोध केला आहे. एक मागासवर्ग आयोग असतानाच दुसरा आयोग कशाला? असा सवाल करत उगाच दिशाभूल करू नका, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नव्या मागासवर्ग आयोगाच्या मुद्द्यावरून सरकार आणि मराठा समाज आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार संभाजी छत्रपती यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी मीडियाने त्यांना नव्या मागासवर्ग आयोगबाबत विचारणा केली असता संभाजी छत्रपती यांनी या आयोगाला विरोध दर्शविला. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, अशा शब्दात संभाजी छत्रपती यांनी सरकारला ठणकावले.

इतर बातम्या:

Russia Ukraine War Video: आम्ही हत्यार नाही सोडणार, देश सोडून गेल्याच्या अफवांवर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचं सडेतोड उत्तर, याला म्हणतात नीडर लीडर

शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या का नाही?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.