AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ईडीकडून अनिल अंबानी यांचं घर जप्त, मोठी कारवाई

ईडीकडून उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘Abode’ या निवासस्थानावर तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या घराची किंमत सुमारे 3,716 कोटी रुपये इतकी आहे.

मोठी बातमी! ईडीकडून अनिल अंबानी यांचं घर जप्त, मोठी कारवाई
anil ambaniImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 25, 2026 | 7:15 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘Abode’ निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे. दरम्यान ईडीने कारवाई करण्यापूर्वी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं देखील त्यांना मोठा धक्का दिला होता. उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाशी संबंधित एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाचा अंतरिम आदेश रद्द करण्यात आला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना फसवे म्हणून वर्गीकृत करण्याच्या कारवाईला एक न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्थगिती दिली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडीकडून ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. या संदर्भात पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ईडीकडून या प्रकरणात तात्पुरत्या स्वरुपात जप्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) शी संबंधित एका कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणाशी निगडीत आहे.

अनिल अंबानी यांच्या ज्या निवासस्थानावर ईडीकडून कारवाई करण्यात आली ती आलिशान इमारत मुंबईतील पाली हिल परिसरामध्ये आहे.‘Abode’ असं या इमारतीचं नाव असून, ही एकूण 17 मजल्यांची इमारत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे. दरम्यान ही कारवाई जरी ईडीकडून तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली असली तरी देखील यामुळे आता अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी यांची आता दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी पीएमएलए अंतर्गत त्यांचा जबाव नोंदवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...