AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Ranking : अभिषेक फ्लॉप कामगिरीनंतरही पहिल्या स्थानी, तिलकला मोठा झटका, सूर्याचं काय?

Icc T20i Ranking Team India : आयसीसीने बुधवारी 25 फेब्रुवारीला रँकिंग जाहीर केली. या रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी सिंहासन कायम ठेवलं आहे. तर इशान किशन याला चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे.

Icc Ranking : अभिषेक फ्लॉप कामगिरीनंतरही पहिल्या स्थानी, तिलकला मोठा झटका, सूर्याचं काय?
Abhishek Sharma and Ishan Kishan Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Feb 25, 2026 | 6:39 PM
Share

टीम इंडियाने साखळी फेरीत विजयी चौकार लगावत भारतीय चाहत्यांची मनं जिंकली. मात्र सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं गणित फिस्कटलं आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतावर मोठ्या फरकाने मात केली. त्यामुळे आता भारताला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सुपर 8 मधील उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. टीम इंडिया गुरुवारी 26 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीतील दुसरा सामना हा झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी आयसीसीने 25 फेब्रुवारीला रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिगमध्ये टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूला किती फायदा झाला आहे? हे जाणून घेऊयात.

अभिषेकचा जलवा कायम

टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा याला त्याने केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली. मात्र अभिषेकने माती केली. अभिषेक सलग 3 सामन्यात झिरोवर आऊट झाला. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 फेरीतील सामन्यातही त्याला काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतरही अभिषेक टी 20I रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. अभिषेकला अव्वल स्थान कायम राखण्यात त्याच्या मागील काही मालिकांमधील कामगिरीचा फायदा झाला आहे.

अभिषेकच्या खात्यात किती रेटिंग?

अभिषेकने अपवाद वगळता वर्ल्ड कपआधी झालेल्या टी 20I सामन्यांत अप्रतिम कामगिरी केलीय. अभिषेकने त्याच कामगिरीच्या जोरावर आपलं सिंहासन कायम राखण्यात यश मिळवलंय.

आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार, अभिषेकच्या खात्यात 877 रेटिंग पॉइंट्स आहेत. अभिषेकने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 4 सामन्यांत एकूण 15 धावा केल्या. मात्र अभिषेकच्या क्रमवारीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अभिषेक व्यतिरिक्त रँकिंगमध्ये डावखुरा फलंदाज इशान किशन आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह या दोघांनाही चांगला फायदा झाला आहे.

इशानचा तिलक-सूर्याला दणका

तसेच इशान किशन याने तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांना मागे टाकत 3 स्थानांची झेप घेतली आहे. इशान आठव्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. सूर्या सहाव्या स्थानी कायम आहे. तिलक चौथ्या स्थानावरुन सातव्या क्रमांकावर घसरला आहे.

टी 20i चा ‘सिकंदर’,  रझा नंबर 1 ऑलराउंडर

जसप्रीत बुमराह याचं टॉप 10 मध्ये कमबॅक

गोलंदाजांच्या क्रमवारीत मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने पहिलं स्थान कायम राखलंय. तसेच जसप्रीत बुमराह टॉप 10 मध्ये परतला आहे. बुमराहने मोठी झेप घेतली आहे. बुमराह 7 स्थानांची झेप घेत थेट आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या होत्या. बुमराहला त्या कामगिरीचा फायदा झाला आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...