शेतकऱ्यांना 5 हजार दिले म्हणजे उपकार केले नाही, आम्हाला भीक…, भाजपचा हा नेता प्रचंड संतापला, पक्षाला घरचा आहेर
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले. मात्र आता सरकारच्या या तुटपुंज्या मदतीवरून भाजप नेत्यानेच संताप व्यक्त केला आहे. सरकारला घरचा आहे दिला आहे.

राज्यात यंदा दुष्काळ पडला आहे, ऐल निनोच्या प्रभावामुळे पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पीकं तर हातातून गेलीच आहेत, परंतु पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. दिवाळीपूर्वी सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आग्रीम मदत केली होती. मात्र यावरून आता भाजप नेत्यानेच संताप व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दिले म्हणजे काय उपकार केले नाहीत, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असं भाजप नेत्याने म्हटलं आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले. मात्र आता सरकारच्या या तुटपुंज्या मदतीवरून भाजप नेत्यानेच संताप व्यक्त केला आहे. सरकारला घरचा आहे दिला आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते विनोद बांते यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दिले मात्र त्यांनी काय उपकार केला नाहीत, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप यावेळी बांते यांनी केला आहे. दरम्यान आम्हाला भीक नको, आमच्या धानाला बोनस द्या, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. सरकारच्या काही निर्णयामुळे गावातील नाले, रस्त्यांची कामे, इतर विकास कामे प्रभावित झाले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांवर मर्यादा घालण्यात आली आहे. तर, दुसरीकडे आमदार आणि खासदारांना मात्र सरकारनं रान मोकळं करून दिलं आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. भंडारा जिल्ह्यातील बेलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात विनोद बांते बोलत होते. त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.