शरद पवारांचा नेमका डाव काय? एनडीएत सामील होणार का? भाजपच्या संकटमोचकानं मनातलं सांगितलं

शरद पवारांच्या भूमिकेने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवार आता एनडीएत येणार का, यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं भाष्य केलं आहे.

शरद पवारांचा नेमका डाव काय? एनडीएत सामील होणार का? भाजपच्या संकटमोचकानं मनातलं सांगितलं
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 4:04 PM

किशोर पाटील, प्रतिनिधी : डिलिमिटेशन विधेयकावरून राजकारण तापलं आहे. शरद पवार आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी विधेयकाच्या बाजूने सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. दोन्ही पक्षाच्या भूमिकेने राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आता भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते गिरीश महाजन यांनी मोठं भाष्य केलं आहे.

गिरीश महाजन यांनी म्हटलं की, इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे एवढे दोनच पक्ष राहतील, असं मला वाटतंय. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या पक्षांशिवाय एकही पक्ष इंडिया आघाडीमध्ये राहणार नाही. शरद पवारांचे आभार…इकडे महायुतीच्या बाजूने सर्वजण आले आहेत.  शरद पवार साहेबांचा पक्ष, डीएमके पक्ष देखील आमच्या बाजूने आला आहे. बहुमताच्या दृष्टीने आता आमची तयारी झाली आहे, आता हे बिल पारित होणार आहे. काँग्रेसने आणि संजय राऊत यांनी कितीही बडबड केली, तरी त्याला काही अर्थ नाही.  डिलिमीटेशनसाठी सर्व देश एकवटला आहे. काँग्रेस आणि संजय राऊत यांच्या पक्षाच्या बाजूने आता कोणीही राहिलेले नाही. तोंडसुख घेणं आणि वायफळ बडबड करणं याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही’.

Loading...

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होणार का, यावर गिरीश महाजन म्हणाले, आता तो पुढचा प्रश्न आहे. आज त्याबाबत कोणी सांगू शकत नाही. मी एवढा मोठा नेता नाही.  दिल्लीवरून काय ते ठरेल..मात्र राजकारणात काहीही अशक्य नाही’. गिरीश महाजन पुढे म्हणाले,  सर्व दक्षिण भारतातील पक्ष आमच्या बाजूने उभे राहिले आहे. नरेंद्र मोदींना समर्थन त्यांनी दिले आहे. असे कुणाला वाटलं होते का? पण ते शक्य झाले आहे, त्यामुळे राजकारणात काहीही अशक्य राहिलेलं नाही’. राज ठाकरेंवर भाष्य करताना महाजन म्हणाले, ‘राज ठाकरे तर काहीही बोलू शकतात. फक्त फौज आहे, त्यांच्याकडे पण सेनापती कोणी नाही. त्यांची टोळी आहे. ते काहीही बोलू शकतात, त्यांना सर्वांना अधिकार आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us