Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन ‘मविआ’त विसंवाद! पडद्यामागे काय घडतंय? भाजप नेत्याने सगळं सांगितलं

संजय राऊत राऊत म्हणतात की शरद पवार सत्तेत जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाण वेगळी भूमिका मांडतात म्हणजे यांच्याच बोलण्यात तफावत आहे, असा टोला प्रविण दरेकर यांनी लगावला.

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन मविआत विसंवाद! पडद्यामागे काय घडतंय? भाजप नेत्याने सगळं सांगितलं
| Updated on: Nov 14, 2026 | 4:59 PM

 Pravin Darekar News:  राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचीच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आता विलिनीकरणाच्या चर्चांवरुन राष्ट्रवादीमध्येच दोन गट पडल्याचेही बोलले जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण ही दंतकथा आहे, शरद पवार सत्तेत जाणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आता संजय राऊत यांच्या विधानावरुन भाजप नेते प्रविण दरेकर यांनी जोरदार टिका केली आहे.

काय म्हणालेत प्रविण दरेकर?

Loading...

“संजय राऊत म्हणतात की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय दोन दिवसात संपेल. पण शरद पवार, सुनेत्रा ताई जो पर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही. पण मविआत याबाबत विसंवाद आहे. संजय राऊत राऊत म्हणतात की शरद पवार सत्तेत जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाण वेगळी भूमिका मांडतात म्हणजे यांच्याच बोलण्यात तफावत आहे, असा टोला प्रविण दरेकर यांनी लगावला. तसेच शरद  पवार अभ्यासू धोरणी राजकारणी आहेत. मिडीयात दोन एनसीपीची चर्चा आहे मात्र  त्या त्या पक्षाचे प्रमुख भूमिका घेत नाहीत तोपर्यंत ह्या चर्चाच आहेत,” असंही प्रविण दरेकर म्हणालेत.

दुसरीकडे यावेळी बोलताना प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांवरही निशाणा साधला. “रोहित पवार यांनी मफलर मॅनबाबत सगळ्यात आधी विधान केलं होतं, जो विषय संपला त्याबाबत चर्चा घडवून कुणाला काय मिळेल हे वेगळं सांगायची गरज नाही. रोहित पवारांकडून अजित पवार यांच्या मृत्यूचा विषय धगधगत ठेवून राजकारण सुरू आहे. अजित पवार यांच्या घातपासाच्या संदर्भात अनेक संस्था काम करत आहेत मात्र रोहीत पवार त्याचे भांडवल करत आहेत,” अशी टिका प्रविण दरेकर यांनी केली.

छठपुजेवरुन राज ठाकरेंना टोला! 

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छठपुजेला मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजल्याच्या प्रकरणावरुन भाजपवर हल्लाबोल केला होता. यावरुनही प्रविण दरेकर यांनी मनसे अध्यक्षांना टोला लगावला.  राज्याचे लोक कशातच अडकत नाहीत, ते देशप्रेमी आहेत. मनसेची नगरसेविका छठपुजेचे बॅनर लावते, पण राज ठाकरे आव्हान करतात त्याला अर्थ प्राप्त होत नाही. छटपुजा ही यूपीची परंपरा आहे. जर ती  जपण्याचा प्रयत्न होत असेल तर गैर काय? असा सवाल यावेळी प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us