भाजपकडून मुख्यंत्र्याच्या वाढदिवशी सेवा यज्ञाचा संकल्प; सर्वसामान्यांना मिळणार ‘या’ योजनांचा लाभ

devenrda fadnavis birthday : भाजपने मुख्यंत्र्याच्या वाढदिवशी सेवा यज्ञाचा संकल्प निश्चित केला आहे. भाजप रक्तदानाचं महाभियान देखील राबवणार आहे.

भाजपकडून मुख्यंत्र्याच्या वाढदिवशी सेवा यज्ञाचा संकल्प; सर्वसामान्यांना मिळणार या योजनांचा लाभ
| Updated on: Jul 21, 2026 | 9:40 AM

महाराष्ट्र भाजप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करणार करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला भाजप सेवा यज्ञाचा संकल्प म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी भाजपकडून संपूर्ण राज्यभर रक्तदान महाभियान एक सामाजिक उपक्रम राबवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी भाजपकडून एक लाख रक्तदात्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं जाणार आहे. यासाठी 19 ते 23 जुलै या दिवशी महाभियान राबवलं जाणार आहे.

भाजपकडून राजस्व अभियान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपने (BJP) वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमाविषयी खासदार धनंजय महाडिक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यात सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. सरकारने 22 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. यातील पहिला कार्यक्रम म्हणजे राजस्व अभियान होय. शासन आणि भाजपच्या वतीने राजस्व अभियान राबवलं जाणार आहे’.

‘राज्यातील पाणंद रस्त्याचा होणार विकास’

‘यात मुख्यमंत्री बळीराजा (Farmer) शेत पाणंद रस्ते योजना अभियान राबवलं जाणार आहे. यातून राज्यातील पाणंद रस्त्याचा विकास होणार आहे. सात बाऱ्यावर नाव नोंदणी, दुरुस्ती करणे, वासरा नोंदणी, सातबारा फोड करणे अशी सगळी कामे केली जाणार आहे. ही सर्व कामे केली जातील. दिव्यांग बांधव, युवक, शेतकरी महिलांच्या समस्या सोडवल्या जातील. मी सर्वांना आवाहन करतो की, या शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच 22 आणि 23 जुलै रोजी महारक्तदान अभियान आयोजित केले जाणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. तुमचं रक्तदान एखाद्याला जीवनदान होऊ शकते. त्यामुळे मोठ्या संख्येने या शिबीरात सहभागी व्हावे, असेही आवाहन खासदार महाडिक यांनी केले.

Follow Us