AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut: विनायक राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार? राऊत यांनी दिले संकेत; काय घडणार?

Vinayak Raut: माजी खासदार विनायक राऊत यांचे कुटुंबिय सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे संकेत दिले आहेत.

Vinayak Raut: विनायक राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार? राऊत यांनी दिले संकेत; काय घडणार?
Vinayk RautImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 16, 2026 | 12:59 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सतत काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणी पक्षांतर करत आहे, कोणाची खासगी प्रकरणे समोर येत आहेत. सतत काही ना काही घडताना दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते विनायक राऊत यांचे कुटुंबिय देखील चर्चेत आहेत. राऊतांची सून गिरिजा यांनी पती गितेश राऊतवर खळबळजनक आरोप केले. याविषयी प्रश्न विचारताच विनायक राऊत यांनी थेट या विषयात बोलण्यासारखे काहीही नाही असे म्हटले आहे.

“या विषयात बोलण्यासारखे काहीही नाही”

विनायक राऊत यांनी मुलगा गितेशच्या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता वर्तवली आहे. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत संकेत दिले. राऊत म्हणाले, “या विषयात बोलण्यासारखे काहीही नाही. अँटीसेप्टरिबेल प्रकरण अद्यापही कोर्टात पेंडिंग आहे. त्याची सुनावणी २३ तारखेला आहे आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर आणि न्यायालयावर.”

वाचा: तो माझ्या मासिक पाळीच्या वेळी मोबाईलमध्ये… विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप

ते पुढे म्हणाले, “जाणीवपूर्वक पॉलिटिकली ड्रामेबाजी केली जात असेल तर ठीक आहे. सध्या याच्यावर मला काही बोलायचे नाही. मी २३ तारखेनंतर बोलणार आहे. आज मी तुम्हाला काही सांगत नाही, २३ तारखेनंतरच सांगेल.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे संकेत

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीची शक्यता स्पष्ट केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री आमचेही आहेत. मी सुद्धा त्यांना भेटू शकतो.” राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. २३ तारखेनंतर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरण न्यायालयीन पातळीवर असल्याने राऊत यांनी सावध भूमिका घेतली असल्याचे दिसते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी दाखवून त्यांनी राजकीय संवादाची दारं खुली ठेवली आहेत. या विकासामुळे आगामी काळात शिवसेना (यूबीटी) आणि महायुती सरकार यांच्यातील संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. २३ तारखेची सुनावणी आणि त्यानंतर राऊत यांचे विधान यामुळे पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...