AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : ‘गोविंदाने स्वतःच्याच मुलीला उद्ध्वस्त केलं…’, सुनीता अहूजाकडून कटू सत्य समोर, कसं आहे बाप लेकीचं नातं?

Tina Ahuja Birthday : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण अभिनेत्याचा मुलगा आणि मुलगी दोघे अद्याप प्रसिद्धी झोतात आलेले नाहीत... आता मुलीबद्दल सुनीता अहूजा हिने कटू सत्य सांगितलं आहे.

Govinda : 'गोविंदाने स्वतःच्याच मुलीला उद्ध्वस्त केलं...', सुनीता अहूजाकडून कटू सत्य समोर, कसं आहे बाप लेकीचं नातं?
अभिनेता गोविंदा
| Updated on: Jul 16, 2026 | 12:57 PM
Share

Tina Ahuja Birthday : अभिनेता गोविंदा आज मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी, त्याचा जलवा आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. गेल्या सात वर्षांपासून अभिनेत्याचा कोणताच सिनेमा हिट झाला नाही. पण तरी देखील अभिनेता कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, गोविंदा यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला. पण अभिनेत्याची दोन्ही मुलं आजही प्रसिद्धीझोतापासून दूर आहेत. अभिनेत्याची लेक टीना अहूजा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनेत्री म्हणून टीना उदयास येऊ शकली नाही… टीना हिचं करियर का फेल झालं याचं कारण खुद्द तिने सांगत वडिलांना दोषी ठरवलं आहे.

टीना अहूजाने 2015 मध्ये केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण…

टीना अहूजाने 2015 मध्ये केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा टीना फक्त 26 वर्षांची होती. तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं, ‘सेकंड हँड हस्बँड’, या सिनेमातून टीना हिला ओळख तर मिळाली, पण फार काळ टिकली नाही. 2020 मध्ये ‘ड्रायविंग मी क्रेझी’ सिनेमातून टीना चाहत्यांच्या भेटीस आली. पण सिनेमा वाईट प्रकारे बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर ‘मिलो ना तुम’ या म्यूझीक व्हिडीओमध्ये देखील टीना झळकली. पण तिचं बॉलिवूडमधील करियर फार छोटं आणि अपयशी ठरलं.

का उद्ध्वस्त झालं टीना अहूजाचं करियर?

एका शोमध्ये खुद्द टीना हिनेच तिच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं होतं. ‘मां है ना’ कार्यक्रमात टीना म्हणालेली, ‘निर्मात्यांनी आधीच माझ्याबद्दल त्यांचे विचार पक्के केलेले. गोविंदाची लेक आहे म्हणून ऑडिशन देणार नाही. स्क्रिन टेस्ट देणार नाही… पण या सर्व गोष्टींसाठी मी तयार होते. निर्मात्यांना असं वाटायचं की, गोविंदा सेटवर येतील आणि मोठा वाद निर्माण करतील. त्यामुळे मला सिनेमात कास्ट करण्यापूर्वी निर्माते फार विचार करायचे…’

एवढंच नाही तर, एका मुलाखतीत सुनीता अहुजा हिने सांगितलं होतं की, ‘वडील गोविंदामुळे माझ्या लेकीचं आयुष्य बर्बाद झालं. स्टारकिड असल्याचा टीनाच्या करियरवर फार मोठा प्रभाव पडला… गोविंदाची मुलगी आहे म्हणून तिला कोणी काम देण्यासाठी तयार होत नव्हते…’, आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी टीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा