Sanjay Raut | डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
उबाठा ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नगपूरमधील रामरक्षेबबात मोठं विधान केलं इतकेच नाहीतर त्यांनी डिलीमीटेशन बिलाबाबतही परखड मत मांडलं. महत्त्वाचं म्हणजे, सुप्रिया सुळेंनंतर आता संजय राऊतांनीही थेट संकेत दिले आहेत.
उबाठा ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नगपूरमधील रामरक्षेबबात मोठं विधान केलं इतकेच नाहीतर त्यांनी डिलीमीटेशन बिलाबाबतही परखड मत मांडलं. महत्त्वाचं म्हणजे, सुप्रिया सुळेंनंतर आता संजय राऊतांनीही थेट संकेत दिले आहेत. डिलीमीटेशन विधयकाबाबत प्रश्न विचारताच राऊतांनी सांगितलं की, “या विधेयकात योग्य त्या सुधारण झाल्यास नक्की विचार करु.” राऊतांनी एका वाक्यातचं विषय संपवला मात्र त्यांच्या या विधानेने वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता नामंजूर झालेलं तसेच सत्ताधारी पक्षासाठी धक्का मानला जाणाऱ्या विधेयकाबाबत आगामी काळात कोणता निर्णय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान संजय राऊतांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिले आहे. राऊत सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. 18 जुलै रोजी रामरक्षा आंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यातच त्यांनी फडणवीस यांना निमंत्रण धाडले आहे. पत्रात त्यांनी लिहिलं, “ज्या पद्धतीने राम मंदिरात चोरी आणि लूटमार झाली आहे. हजारो आणि शेकडो कोटींची चोरी झाली आहे, ही गोष्ट विश्वास आणि श्रद्धेला तडा देणारी आहे. हा धक्का फडणवीस यांना सुद्धा बसला असेल. त्यांना जर खरोखरीच तसा धक्का बसला असेल तर त्यात त्यांनी सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा.”
Published on: Jul 16, 2026 11:15 AM
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...

