AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील

Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील

| Updated on: Jul 16, 2026 | 12:25 PM
Share

भारतीय रेल्वेच्या इतिहासात उद्या नवा अध्याय लिहिला जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पर्यावरणपूरक आणि हरित वाहतुकीच्या दिशेने भारतीय रेल्वेचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने हायड्रोजन ट्रेनचा अधिकृत व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे.

हायड्रोजन इंधनावर चालणारी ही ट्रेन पारंपरिक डिझेल इंजिनांच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूरक मानली जाते. या ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जनात घट होण्यास मदत होणार असून, हरित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वे स्वच्छ ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दिशेने सातत्याने पावले उचलत असून, देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या शुभारंभाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 16, 2026 12:25 PM

Follow Us