Nagesh Ashtikar Photo | थेट अमित शहांसोबतचा…. आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गाटील फुटीर खासदार देखील होते. बंडखोर खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गाटील फुटीर खासदार देखील होते. बंडखोर खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीतील फोटो आता खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंदेखील दिसत आहेत.
उशीरा रात्री झालेल्या या भेटीबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनी माध्यामांसमोर स्पष्टीकरण दिलं होतं. या भेटीदरम्यान सर्व नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. तब्बल ५० मिनिटं ही बैठक सुरु होती. या भेटीदरम्यान, शिंदेसेनेत आलेल्या या सहाही खासदारांच्या आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच, या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभेतील खासदारांचे विलीनीकरण आणि शिंदेसेनेच्या राजकीय सहभागाबद्दल देखील चर्चा झाली असल्याचही त्यांनी सांगितलं.
Published on: Jul 16, 2026 12:48 PM
थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी...

