AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut Daughter-in-law: तो माझ्या मासिक पाळीच्या वेळी मोबाईलमध्ये… विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप

Girija Raut: ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांचे पुत्र मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत यांच्या पत्नीने कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. गिरिजा यांनी कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Vinayak Raut Daughter-in-law: तो माझ्या मासिक पाळीच्या वेळी मोबाईलमध्ये... विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप
Gitesh RautImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 9:31 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत हे सध्या चर्चेत आहेत. गितेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी ठाण्यात राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गिरिजा यांनी या तक्रारीमध्ये गितेश राऊत यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

गिरिजा राऊत यांनी तक्रारीमध्ये गितेश राऊत हे सतत मासिक पाळीकडे लक्ष ठेवत असत असे सांगितले आहे. तो फोनवर नोंद करून ठेवत होता व माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल, असे विकृतपणे वागत होता असा आरोप गिरिजा यांनी केला आहे. तसेत सासूबाईंनी देखील मानसिक छळ केल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये सांगितले आहे.

सासूबाईंमुळे नात्यात दुरावा

पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये गिरिजा यांनी म्हटले की, माझी सासू माझा नवरा घरी असताना व तो घरी नसल्यास पूर्णपणे वेगळी वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारुन, माझ्या घरच्यांबद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी व आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे.

मासिक पाळीवर सतत लक्ष

पुढे त्या म्हणाल्या, माझा पती हा मला मासिक पाळी कधी येईल त्याबाबत सर्व माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवत होता व माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल, असा विकृतपणे वागत होता. तसेच N.C.R.B (एन.सी.आर.बी) त्याचेवडील, विनायक राऊत, हे खासदार असल्याने त्यांचे कोणते न कोणते कार्यक्रम सतत चालू होते. त्यावेळी सदर कार्यक्रमाला अडचण नको म्हणून माझी सासू, शामल राऊत व गितेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते. त्यामुळे माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता, असं गिरीजा राऊत यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद