Sandeep Deshpande | चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय? संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप; मनसेचा आंदोलनाचा इशारा
मुंबईतील चेंबूर परिसरात झाड कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबई महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांना पत्र लिहून दुर्घटनेच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संदीप देशपांडे यांनी पत्रातून कोसळलेल्या झाडाचे ट्री रिस्क अस्सेसमेंट (Tree Risk Assessment) करण्यात आले होते का, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणात जबाबदार असलेल्या उद्यान अधीक्षकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना देशपांडे म्हणाले की, प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला. मात्र, दुर्घटनेनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांना क्लीनचिट देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि तटस्थ समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत संदीप देशपांडे यांनी इशारा दिला की, जर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल. दरम्यान, चेंबूर दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरून आता नवा वाद निर्माण झाला असून, या प्रकरणात महापालिका प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 16, 2026 11:23 AM
चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय?
डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका!
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट