मोठी खळबळ! ‘त्या’ कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट एकनाथ शिंदेंकडे धाव…
उबाठा ठकारे गटाला धक्का देत सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरला होता. यानंतर त्यांची बिनविरोध निवडही झाली मात्र आता माहायुतीमध्ये काहीतरी बिनसलं आहे. अशा चर्चांना उधाण आलं आहे.
उबाठा ठकारे गटाला धक्का देत सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरला होता. यानंतर त्यांची बिनविरोध निवडही झाली मात्र आता माहायुतीमध्ये काहीतरी बिनसलं आहे. अशा चर्चांना उधाण आलं आहे.
महायुतीमधील नेत्यांमध्ये सरकारी बंगल्यांच्या वाटपावरून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर झालेल्या निवासस्थानाबाबत झालेल्या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर त्यांना सरकारी निवासासाठी ‘रायगड’ हा बंगला मंजूर करण्यात आला होता.
मात्र, नंतर हा निर्णय बदलण्यात आला आणि त्याऐवजी चर्चगेट परिसरातील फ्लॅट देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे सचिन अहिर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हक्काचा बंगला मिळाला नसल्याने ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या आधीही नीलम गोऱ्हे यांचा ‘पुरंदर’ बंगला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना देण्यात आल्याची माहिती आहे. सरकारी बंगल्यांच्या वाटपावरून महायुतीमध्ये मतभेद वाढत असल्याच्या चर्चांनी आता राजकीय वातावरण तापले आहे.
Published on: Jul 16, 2026 10:47 AM
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती?
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी

