AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका! सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा

ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका! सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा

| Updated on: Jul 16, 2026 | 10:57 AM
Share

राजधानी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण आज 19व्या दिवशीही सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पेपरफुटी, शैक्षणिक घोटाळे आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राजधानी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण आज 19व्या दिवशीही सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पेपरफुटी, शैक्षणिक घोटाळे आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत सोनम वांगचुक यांच्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले आहे. “पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदार मंत्र्यांवर कारवाई ही रास्त मागणी असून, सरकारने ती मान्य करावी,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाहीतील आंदोलनाच्या अधिकारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याची टीका केली. त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत, सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या आवाजांना दाबले जात असल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी लडाखसंदर्भातील सोनम वांगचुक यांच्या पूर्वीच्या आंदोलनांचाही उल्लेख केला. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा, स्थानिकांच्या जमिनींचे संरक्षण आणि लोकप्रतिनिधित्व यांसाठी त्यांनी यापूर्वीही आंदोलन केले होते, मात्र सरकारने केवळ आश्वासने दिली, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी व्यापम घोटाळ्यापासून ते नीट आणि इतर परीक्षांमधील कथित गैरप्रकारांचा उल्लेख करत, देशातील परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक करण्याची गरज व्यक्त केली. “फक्त NEET नव्हे, तर सर्व स्पर्धा आणि शासकीय परीक्षांमध्ये पारदर्शकता आली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, सरकारने विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे आणि केंद्र सरकारच्या पुढील भूमिकेकडे आता देशभराचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 16, 2026 10:55 AM

Follow Us
मोठी बातमी! देवेंद्रजी अवश्य यावे…स्वागतास उत्सुक… संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण, नागपूरमध्ये घडतंय काय?.

मोठी बातमी! देवेंद्रजी अवश्य यावे…स्वागतास उत्सुक… संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण, नागपूरमध्ये घडतंय काय?

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

पाकिस्तानात मोठा हाहाकार! पार लागली वाट, लोक रस्त्यावर, अन्नधान्य नाही, थेट...

पाकिस्तानात मोठा हाहाकार! पार लागली वाट, लोक रस्त्यावर, अन्नधान्य नाही, थेट..

MPSC ऑनलाइन परीक्षेबाबात फडणवीसांचा मोठा निर्णय, विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?.

MPSC ऑनलाइन परीक्षेबाबात फडणवीसांचा मोठा निर्णय, विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?

मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; ‘एक मित्र म्हणून त्याच्या..’.

मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; ‘एक मित्र म्हणून त्याच्या..’

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..