पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या गेवराईच्या शेतकऱ्याची आशिष शेलारांनी घेतली भेट

सकाळी अकरापर्यंत बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस आम्हाला मारतात मग बियाणे आणि खते शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने बांधावर आणून द्यावे. | Ashish Shelar Farmer

पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या गेवराईच्या शेतकऱ्याची आशिष शेलारांनी घेतली भेट
| Updated on: Jun 02, 2021 | 1:13 PM

गेवराई: कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेले शेतकरी मोतीराम चाळक यांना काही दिवसांपूर्वी पोलीसांनी बेदम मारले होते. बीड दौऱ्यावर असणाऱ्या भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी या शेतकऱ्याची भेट घेतली. त्यांच्यावर झालेला अन्याय मंत्रालयापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही दिली. तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी आम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करु असेही आश्वस्त केले. (BJP MLA Ashish Shelar meet farmer in beed beaten by Police)

लॉकडाऊनचे नियम आम्ही पाळतो. सकाळी अकरापर्यंत बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस आम्हाला मारतात मग बियाणे आणि खते शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने बांधावर आणून द्यावे. जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतीसाहित्यासाठी निघालेल्या तरुणाला मुस्काटात, API कडून शिवीगाळ, व्हायरल व्हिडीओने संताप

काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी एका तरुणाला श्रीमुखात लगावल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार हे परभणी शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका तरुणाला रोखून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. हा तरुण गावातून शहराकडे शेतीचं साहित्य खरेदीसाठी आला होता. त्याला थांबवून API अर्जुन पवार यांनी मारहाण केली. मात्र शेतीकामाची कोणतीही कामं-दुकानं थांबवलेली नाहीत, असं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जातं. तरीही अशी अमानुष मारहाण का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता.

इतर बातम्या:

देशातील शेतकऱ्यांना यूनिक किसान आयडी क्रमांक मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय

लॉकडाऊनमध्ये गावाकडं आली, शिक्षिकेनं शेती करण्याचं ठरवलं, 5 टन कलिंगड विक्रीतून लाखो मिळवले

केंद्र सरकारकडून गव्हाची विक्रमी खरेदी, 43 लाख शेतकऱ्यांना 80 हजार कोटी मिळाले

(BJP MLA Ashish Shelar meet farmer in beed beaten by Police)