देशातील शेतकऱ्यांना यूनिक किसान आयडी क्रमांक मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय

देशातील शेतकऱ्यांना यूनिक किसान आयडी क्रमांक मिळणार, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय
प्रातिनिधीक फोटो

केंद्र सरकार शेतकऱ्यांना एक युनिक आयडी देणार आहे unique farmer id number

Yuvraj Jadhav

|

Jun 01, 2021 | 6:54 PM

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी मंत्रालय शेती क्षेत्रामध्ये डिजीटलायझेशन चा प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नाअंतर्गतदेशभरातील शेतकऱ्यांचा केंद्रीभूत डाटाबेस तयार करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. या माहितीच्या आधारे शेती क्षेत्रामध्ये डिजीटल सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या डाटाबेसला देशातील शेतकऱ्यांच्या जमिनीचया रेकॉर्ड सोबत जोडले जाईल. यानंतर शेतकऱ्यांना एक युनिक किसान आयडी दिला जाईल. शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध सरकारी योजनांचा माहिती यामध्ये नोंदवली जाईल.याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात मध्ये होऊ शकतो. शेतकऱ्यां बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी देखील त्याचा सरकारला उपयोग होईल. (Central Agriculture Ministry will issue Unique Farmer ID Number to all Farmers)

पाच कोटी शेतकऱ्यांचा डाटा तयार

केंद्र सरकारच्या या उपक्रमांमध्ये आत्तापर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटाबेस तयार झाला आहे. पुढील काळात देशातील सर्व शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटाबेस तयार केला जाईल अशी अपेक्षा आहे. पी एम किसान सन्मान योजना, सॉईल हेल्थ कार्ड, प्रधानमंत्री पिक विमा योजना या संबंधित असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे डाटा एकत्रित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय, रासायनिक खते मंत्रालयं, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय आणि इतर मंत्रालयाकडून माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा

या डाटाबेसच्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करायची, कोणत्या प्रकारचे बी बियाणे वापरायचं कधी लागवड करावी, त्याची कापणी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाईल. शेतीसंबंधी विविध विकास योजना सुरु करण्याबाबत सरकारला या डाटाबेसची मदत होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल साठवायचा आहे किंवा विकायचा आहे, कुठे कोणत्या किमतीला विक्री करायची आहे या संबंधी माहिती या डाटाबेसच्या आधारे उपलब्ध होऊ शकते.

केंद्रीय कृषिमंत्री काय म्हणाले

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना युनिक किसान आयडी देण्याचं कारण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रगती करणं, शेतकऱ्यांचे जीवन चांगलं करण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढवणे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं सांगितलं. शेती क्षेत्रात नव्या डिजीटल पद्धतींचा वापर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. कठीण परिस्थितीमध्ये लढून संकटावर विजय करण्याची ताकद ग्रामीण भागातील शेतकरी आणि लोकांमध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांना युनिक किसान आयडी देणार आहे.

संबंधित बातम्या

केंद्र सरकारकडून गव्हाची विक्रमी खरेदी, 43 लाख शेतकऱ्यांना 80 हजार कोटी मिळाले

ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी, मग पुढची चाकं लहान का? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

(Central Agriculture Ministry will issue Unique Farmer ID Number to all Farmers)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें