भाजप आमदार प्राजक्त तनपुरे यांचं घर फोडलं, चोरट्यांनी क्षणात…; पुण्यात एकच खळबळ

भाजप आमदार प्राजक्त तनपुरे यांचं घर चोरट्यांनी फोडलं आहे. पुण्यातील एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी घरातील महागड्या वस्तू लंपास केल्या.

भाजप आमदार प्राजक्त तनपुरे यांचं घर फोडलं, चोरट्यांनी क्षणात...; पुण्यात एकच खळबळ
bjp mla
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 10:30 AM

पुण्याच्या विमाननगरमधून मोठी बातमी हाती आली आहे. चोरट्यांनी भाजप आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या घरात चोरी केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या घरातून अनेक महागड्या वस्तू लंपास केल्या आहत. लुई व्हिटॉन कंपनीची चामड्याची बॅग, ईअरपॉड, सूट, लिप पेन्सिल अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. थेट भाजप आमदाराच्या घरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे यांचे विमाननगरमधील लुकंड स्काय व्हिला सोसायटीत घर आहे. त्यांच्या याच घरात चोरट्यांनी डल्ला मारल्या आहेत. त्यांच्या घरातून महागडी चामड्यांची बॅग झाल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घरात शोधशोध सुरू केली. घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडेही चौकशी केली. सर्वांनी मिळून घरात शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही बॅग मिळाली नाही. चामड्याची बॅगची शोधाशोध करताना घरातील इतर वस्तूं देखील नसल्याचे समोर आलं. त्यामुळे घरात चोरीची संशय आणखी बळावला.

Loading...

चोरीचा संपूर्ण प्रकार हा 22 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत घडली, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानंतर आमदराच्या घरातील कर्मचाऱ्याने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, आमदारांच्या घरात चोरी झाल्याची चर्चा संपूर्ण पुण्यात पसरली. आमदार तनपुरे यांच्या घरातील मौल्यवान वस्तू नेमक्या कोणी चोरल्या आणि चोरी कशी झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे घरात कोणी चोरी केली, याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पुण्यात क्लास चालकांकडे खंडणी मागणारे रॅकेट?

पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालवणाऱ्या संचालकाकडे तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी क्लास चालकाला धमकावण्यात आले आहेत.  याप्रकरणी क्षितिज बर्वे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून माऊली डुचाळ या तरुणाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील नारायण पेठ परिसरात ‘श्रीराम्स आयएएस’ या नावाने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस आहेत. सारथी, महाज्योती, बार्टी आणि टार्टी या शासकीय संस्थांची ही अकॅडमी संलग्न आहे.  संबंधित क्लासचे मुख्यालय दिल्लीमध्ये असून देशभरातील प्रमुख शहरांमध्ये संस्थेच्या अनेक शाखा आहेत. हजारो विद्यार्थी या क्लासच्या माध्यमातून आयएएस आणि आयपीएस झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us