मोठी बातमी! भाजप आमदार प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील कारला अपघात

मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या कारला अपघात झाला आहे. त्याचा ताफा जात असताना त्यांचा कारचा अपघात झाला.

मोठी बातमी! भाजप आमदार प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील कारला अपघात
Pravin darekar accident
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 2:35 PM

मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या कारला अपघात झाला आहे. त्याचा ताफा जात असताना त्यांचा कारचा अपघात झाला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरेकरांच्या ताफ्यातील एका कार आणि टॅक्सीची धडक झाली. या अपघातात दोन्ही कारचे किरकोळ नुकसान झालं. अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. अपघातानंतर प्रवीण दरेकर देखील त्यांच्या कारमधून बाहेर आले.

मुंबईत गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे भाविकांची रस्त्यावर येजा पाहायला मिळत आहे. तर अनेकांकडून खासगी वाहन आणि टॅक्सी वाहनाचा वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्याचदरम्यान राजकीय नेतेही विविध गणेश मंडळांना भेटी देत आहेत. मुंबईत अनेक आमदार, मंत्री हे गणेशोत्सवानिमित्त मंडळांना भेटी देत आहेत. याचदरम्यान प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील एका कारचा अपघात झाला. भाजप आमदार दरेकरांच्या ताफ्यातील कारचा फ्रीवेवर अपघात झाला. या अपघाताची तीव्रता कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us