AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Health Update : प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर सुनेत्रा पवारही शरद पवारांच्या भेटीला, राहुल गांधींचाही फोन

ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात उपचाराधीन आहेत. त्यांची प्रकृती विचारण्यासाठी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली किंवा संपर्क साधला. भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पवार यांना लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar Health Update : प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर सुनेत्रा पवारही शरद पवारांच्या भेटीला, राहुल गांधींचाही फोन
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 11:44 AM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेल्या दोन दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना कफ झाला असून थकवा जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृती विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात नेत्यांची रांग लागली आहे. काल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यावेळी पवार यांनी 11 तारखेनंतर भेटू असं पटेल यांना सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला रुग्णालयात गेल्या आहेत. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्या शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आल्या आहेत. कालच प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सुनेत्रा पवार या पवारांना भेटत असल्याने या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याचे संकेतही मिळत आहेत.

राहुल गांधी, ठाकरेंकडून विचारपूस

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचार घेत असतानाही राहुल आणि प्रियांका गांधी यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली होती, असं सूत्रांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पवारांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली आहे.

राऊत ब्रीच कँडीत

आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला रुग्णालयात आले आहेत.

आज किंवा उद्या डिस्चार्ज

दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती आता ठिक आहे. त्यांना आज रात्री किंवा उद्या सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पवारांना चार दिवसांपूर्वी पुण्याच्या रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुबीत पवार दोन दिवस दाखल होते. दोन दिवस उपचार झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पवार थेट मुंबईला सिल्व्हरओक निवासस्थानी आले होते. पण परत तब्येत बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आले होते.

Follow Us
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...