बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय घेतला असता : उदयनराजे

| Updated on: Jan 08, 2021 | 8:15 PM

औरंगाबादचं नामांतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. आता भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर भाष्य केलंय.

बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय घेतला असता : उदयनराजे
Follow us on

सातारा : औरंगाबादचं नामांतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. आता भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर भाष्य केलंय. बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचाही निर्णय घेतला असता, असं मत उदयनराजे भोसले यांनी केलंय. लोकशाहीत जनता राजे आहेत. त्यामुळे याबाबत जनताच निर्णय घेईल, असंही त्यांनी नमूद केलं (BJP MP Udayanraje Bhosale comment on rename of Aurangabad issue).

उदयनराजे भोसले म्हणाले, “ही लोकशाही आहे. आपण पाहतो बॉम्बेचं मुंबई झालं. तसं लोकं निर्णय घेतील. याबाबत मला काय वाटतं यापेक्षा लोकांनी निर्णय घ्यावा. राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता.”

भरपूर फिरा, लोकांची कामं करा, पण लोकांना फिरवू नका, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उदयनराजे भोसले यांनी सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोले लगावले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फिरत आहेत हे चांगलं आहे. ते लोकांमध्ये फिरतायत, फिरलं पाहिजे. लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी फिरावं, पण लोकांना फिरवू नये,” असा उपरोधक टोला उदयनराजेंनी लगावला.

“कुणीही मला मंत्री करू शकत नाही, मीच मंत्रिमंडळ निवडतो”

उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी खास त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं. ते म्हणाले, “कुणीही मला मंत्री करू शकत नाही, मीच मंत्रिमंडळ निवडतो. माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझं कॅबिनेट आहे.”

हेही वाचा :

भरपूर फिरा, लोकांची कामे करा, पण लोकांनाच फिरवू नका; उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही, उदयनराजेंचं भुजबळांना उत्तर

बंदूक तुमच्या हातात होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता; उदयनराजे भोसलेंचा सवाल

व्हिडीओ पाहा :

BJP MP Udayanraje Bhosale comment on rename of Aurangabad issue