BJP : राऊत तुम्ही आणि तुमचा पक्ष वांझोटा, आपण राख झालेली लंका बघा, भाजपचा तुफान हल्लाबोल
BJP : "सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची गुलामगिरी करणं उबाठाचे काम आहे. एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. करप्शन क्वीन म्हणून तुम्ही हिणवलं होतं त्या कांग्रेससोबत तुम्ही जाऊन बसत आहात, उलट उबाठा ही कांग्रेसची बेनामी शाखा आहे" असा हल्लाबोल भाजपकडून करण्यात आला.

“संजय राऊत यांनी बिहार पोटनिवडणूक जिंकल्यावर देशभर पेढे वाटायला सुरुवात केली आहे. शेजाऱ्यांच्या घरात लेकरू झाल्यावर पेढे वाटायला लागलेत. काँग्रेसची गुलामी करता, करता त्यांचा पराभव झाला आहे. प्रशांत किशोर यांचा विजय झाला आहे, काही हरकत नाही. उबाठाला सेलिब्रेशन करायची वेळ आली नव्हती. राऊत तुम्ही आणि तुमचा पक्ष वांझोटा झाला आहे. शून्य जागा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत मिळाल्या आहेत” अशा शब्दात भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. “बिहारपेक्षा आपल्या राज्यात उबाठाची काय परिस्थिती आहे बघा. बिहारमध्ये आमचा पराभव झालेला नाही. एकतर आम्ही यातून शिकत असतो. मात्र, या पराभवातून आम्ही शिकू आणि तयारीला लागू. राऊत उबाठाचा अहंकार महाराष्ट्राने संपवला आहे” असं नवनाथ बन बोलले.
“पंतप्रधान प्रधान सेवक म्हणवून घेतात. जनतेला सोबत घेऊन चालणारे आम्ही आहोत. अहंकारी कोण होतं हे महाराष्ट्राने बघितलं आहे. राऊत आपण राख झालेली लंका बघा, मग भाजपवर टीका करा. एका निवडणुकीतील पराभवामुळे भाजपला लोक स्वीकारत नाहीत हे पॅरामीटर लावायचे असेल तर गुजरातमध्ये विजय झाला आहे. राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीत अस्तित्व देखील शिल्लक उबाठाचे राहिलेले नाही. मग उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपला हे मान्य करावे” असं नवनाथ बन म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिलं नाही
महाराष्ट्र सरकारमध्ये गुंडांची टोळी आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर बन बोलले की, “अडीच वर्ष मविआ सरकार असताना टोळी होती. वाझे लादेन आहे का? हे म्हणणं गुंडांची टोळी म्हणतात. सर्वसामान्य माणसाला घराबाहेर निघू न देता डांबणे गुंडांची टोळी म्हणतात, साधू हत्याकांडानंतर गप्प बसणे गुंडांची टोळी म्हणतात”
त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत
“देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले नाही, उलट समृद्धी महामार्ग पूर्ण केला. कुंभमेळा चांगला होणार यासाठी खबरदारी घेतली. सर्वसामान्य लोकांसाठी मेट्रो सुरु झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रावर दरोडा टाकत तुम्ही सत्ता मिळवली. दरोडेखोरांची टोळी कोणाची हे सर्वांना माहिती आहे. राम मंदिर संदर्भात अटक झाली आहे, या लुटीवर कोण बोलतं आहे? ज्यांनी हजेरी लावली नाही. राम भक्तांवर गोळ्या झाडल्या, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत” असा आरोप नवनाथ बन यांनी केला.