
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून निवडणुकांचे वारे वाहत आहे. यादरम्यानच लेकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बापानेच चक्क राजीनामा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंतांनी राजीनामा दिला. ठाकरे गटाकडून मुलगी शिवानी सावंत माने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने त्यांनी राजीनामा दिला. राजेश सावंत यांनी म्हटले की, माझी मुलगी शिवानी सावंत माने हिने उद्धव ठाकरे पक्षाकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली आहे. माझी मुलगी नगराध्यक्ष म्हणून निवडणुक लढणार आहे. महायुती होण्याची शक्यता आहे, अश्यावेळी पार्टीला फसवणं योग्य वाटतं नाही.
वडिलांनी मुलीसाठी दिला चक्क जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
आता युतीच्या बैठकांना जावे योग्य वाटतं नाही. राजकारणात नैतिकता ही महत्वाची आहे. वडील आणि मुलगी हे नातं वेगळचं असतं. आठ दिवसापूर्वी राजीनामा राजेश सावंत यांनी राजीनामा दिला. आज मी स्वता भेटून राजीनामा देतो असं त्यांनी सांगितले. पार्टी या गोष्टीचा विचार करेलं असं त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने यांना वडिलांनी घेतलेल्या निर्णयानंतर आपले अश्रू रोखता आली नाही.
वडिलांनी राजीनामा देताच मुलगी झाली भावूक
शिवानी सावंत यांनी म्हटले की, वडिलांनी माझ्यासाठी राजीनामा दिला याचे मला दुःख आहे. हे बोलताना त्यांचे डोळे पाणावली होती. माझ्या वडिलांनी राजीनामा दिला ते माझ्यासाठी काहीही करू शकतात. निवडणुकीसाठीची आमची तयारी सुरू आहे. माझे वडील त्यांच्या पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिले आहेत. उद्धव ठाकरे नेहमीच आमच्या पाठीशी उभे आहेत.
त्या कृतीला मी भावनेतून किंवा शब्दातून व्यक्त करू शकत नाही
माझ्या वडिलांच्या त्या कृतीला मी भावनेतून किंवा शब्दातून व्यक्त करू शकत नाही. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी काल मुलगी विरोधी पक्षामधून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्याने राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवला. आम्हीच जिंकणार असा विश्वास देखील यादरम्यान शिवानी सावंत हिने वर्तवला.