पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीवरून वातावरण तापणार, पुण्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा

मोठी बातमी समोर येत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागेवर महायुतीमध्ये भाजपकडून दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या जागेवर उमेदवार उभा करण्यासाठी शिवसेना शिंदे गट देखील इच्छूक आहे.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीवरून वातावरण तापणार, पुण्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा
chandrakant patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 5:40 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार सांघाच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून पुणे शिक्षक मतदार संघातून उमेदवार मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे इच्छूक आहेत. त्यांनी याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली होती. तर दुसरीकडे आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देखील या दोन्ही मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागा परंपरागत भाजपाच्या आहेत, दोन्ही जागांवर आमचा दावा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागा परंपरागत भाजपाचे असून, या दोन्ही जागांवर भाजपाचा दावा असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे. मात्र महायुती म्हणून दोन्ही मतदारसंघात आम्ही लढणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील, आणि ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे, तर शिक्षक मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षाकडून दावा करण्यात आला आहे, त्यामुळे महायुती मध्ये जागांचा तिढा निर्माण झाला आहे, यावर आता मंत्री चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.

तर दुसरीकडे भाजचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून देखील काही दिवसांपूर्वीच या दोन्ही मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. या दोन्ही मतदारसंघात महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न असेल, परंतु वेळ पडली तर आम्ही भाजप म्हणून देखील लढू असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us