नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का

मुंबई : राज्यातील सहा नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. सहापैकी तीन नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. तर एका ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि जनविकास आघाडी यांना यश मिळालं आहे. स्थानिक पातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. नांदेड जिल्ह्यातील लोहा, वाशिम जिल्ह्यातील रिसोड, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, जळगावातील शेंदुर्णी, यवतमाळ जिल्ह्यातील नेर आणि नागपूर […]

नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का
BJP
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : राज्यातील सहा नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. सहापैकी तीन नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. तर एका ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि जनविकास आघाडी यांना यश मिळालं आहे. स्थानिक पातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

नांदेड जिल्ह्यातील लोहा, वाशिम जिल्ह्यातील रिसोड, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, जळगावातील शेंदुर्णी, यवतमाळ जिल्ह्यातील नेर आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा या नगरपालिका/नगरपंचायतींसाठी मतदान झालं होतं. यामध्ये तीन ठिकाणी भाजपने विजय मिळवला.

नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का

या सहा निवडणुकांपैकी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी धक्कादायक निकाल नांदेडमध्ये लागला. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालंय. एकूण 17 पैकी 13 जागी भाजपा विजयी झाली, तसेच जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे उमेदवार गजानन सुर्यवंशी विजयी झाले आहेत. काँग्रेसला चार जागी विजय प्राप्त करता आला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार प्रताप पाटील यांच्यात थेट सामना या निवडणुकीच्या निमित्ताने झाला. त्यात शिवसेनेचे आमदार असलेले मात्र सध्या मुख्यमंत्री समर्थक बनलेले प्रताप पाटील यांनी जोरदार यश संपादीत केलंय. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

नागपुरात भाजपचा विजय

मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातील मौदा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार भारती सोमनाथे यांना एकूण 2573, तर  काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रोशनी निनावे यांना 2445 मतं मिळाले. भारती सोमनाथे यांचा 128 मतांनी विजय झाला. 17 सदस्यीय नगरसेवकांमध्ये भाजप 8, काँग्रेस 5, शिवसेना 2 आणि अपक्ष 2 अशा जागा जिंकल्या आहेत. इथे राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रातील ही निवडणूक असल्याने प्रतिष्ठेची होती.

चंद्रपुरात काँग्रेसचा विजय

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नगरपरिषदेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. 20 सदस्यांच्या पालिकेत काँग्रेस 11, स्थानिक आघाडी 6 आणि भाजप 3 असे संख्याबळ पुढे आले आहे. तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांचा 1600 मतांनी विजय झाला. त्यांनी भाजपच्या यास्मिन लाखानी यांचा पराभव केला. इथे पालिकेसाठी 70 टक्के मतदान झालं होतं. हे शहर चंद्रपूर आणि गडचिरोली अशा दोन लोकसभा मतदारसंघासाठी महत्त्वाचं आहे. इथला काँग्रेसचा विजय महत्त्वाचा ठरला आहे. मावळती नगर परिषद भाजपच्या ताब्यात असताना त्यांना संख्याबळ टिकवता न आल्याने स्थानिक आघाडीने काँग्रेससह सत्ता स्थापन केली. आता काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

वाशिम

बहुप्रतिक्षित रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नगरसेवकपदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या विजयमाला आसनकर नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. वाशिम जनविकास आघाडीने 9, काँग्रेस 03, शिवसेना 03, भारिप 02 आणि अपक्ष 03 असं संख्याबळ आहे.

गिरीश महाजनांना आणखी एक यश

धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकावणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात भाजपने जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी नगरपंचायत जिंकली. 17 जागा असलेल्या या नगरपंचायतीमध्ये भाजपने 13 आणि राष्ट्रवादीने चार जागांवर विजय मिळवला. भाजपचे विजय खलसे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.

यवतमाळमध्ये शिवसेनेचा विजय

यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगरपरिषदेवर शिवसेनेने झेंडा फडकवला. शिवसेनेच्या सुनीता जयस्वाल या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. 18 सदस्यसंख्या असलेल्या या नगरपरिषदेत शिवसेना 9, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3, अपक्ष 3 असं संख्याबळ आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.