
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एकामागे एक झालेल्या भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. सुदैवाने आज वटपोर्णिमा असल्यामुळे जिवितहानी झाली नाही. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. परंतु वटपोर्णिमेमुळे या सर्व महिलांनी सुटी घेतली होती. त्या महिला कारखान्यात असत्या तर भीषण प्रसंग ओढावला असता. बार्शी तालुक्यातील घारी गावात असलेल्या फटाका कारखान्यात ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे.
बार्शी तालुक्यातील घारी गावात युन्नूस मुलाणी यांचा फटाका कारखाना आहे. या कारखान्याला शुक्रवारी अचानक आग लागली. त्यानंतर कारखान्यातून स्फोटांचे मोठमोठे आवाज परिसरात ऐकू येऊ लागले. धुरांचे लोट परिसरात लांबच्या लांब दिसत होते. हा स्फोट इतक भीषण होता की, आजूबाजूतील परिसराला हादरा बसला. स्फोट झालेल्या त्या फटाका कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. परंतु शुक्रवारी वटपौर्णिमा होती. त्यामुळे पुजेसाठी या महिलांनी सुट्टी घेतली होती. कोणतीही महिला कामाला गेली नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग कशामुळे लागली, ते अजून समोर आले नाही.
फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात सुदैवाने कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झाली नाही. मात्र, कारखाना मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ४० लाखांचे फटाके जळून भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती पांगरी पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान, पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. ते पुढील कारवाई करणार आहे.
नवी मुंबईतील तळोजा येथील रोहिंजन टोल नाक्याजवळ आगीची घटना घडली आहे. भंगार यांच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.