Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरवर प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन वरुन धमकावण्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

Prashant Koratkar :  प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका
Prashant Koratkar
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 11, 2025 | 12:10 PM

मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव गाजत आहे, ते म्हणजे प्रशात कोरटकर. या प्रशांत कोरटकरला आज मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत तसच राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय घ्यावा असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. प्रशांत कोरटकर यांच्यासाठी हा झटका आहे. त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला होता. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला अनेक जळजळीत प्रश्न विचारले, कोंडीत पकडलं. त्यामुळे राज्य सरकारनेही प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द व्हावा यासाठी पावलं टाकली.

प्रशांत कोरटकरवर प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन वरुन धमकावण्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. कोरटकर यांच्या अंतरिम जामीनाविरोधात मुंबई हाय कोर्टात सुनावणी सुरु झालेली आहे. कोल्हापूर आणि नागपूर या दोन्ही भागात त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. एकाप्रकरणात त्याला अंतरिम जामीन मिळालेला. दुसऱ्या केसमध्ये मिळाला नव्हता.

त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले

प्रशांत कोरटकर याने जी वक्तव्य केली, त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द व्हावा, यासाठी राज्य सरकारने हाय कोर्टात अपील केलं. “प्रशांत कोरटकर या तथाकथित पत्रकाराने भ्रष्ट मार्गाने बऱ्याच गोष्टी केल्याच समोर आलय. त्याने इंद्रजीत सावंत यांच्याबद्दल जे वक्तव्य केल, त्याची भाषा क्रूरतेची होती. जातीय तेढ निर्माण करणारी भाषा होती” असं प्रसिद्ध वकिल असिम सरोदे म्हणाले.