शिर्डी विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : निनावी पत्राद्वारे शिर्डी विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पोस्टाद्वारे आलेल्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. राहाता पोलीस स्टेशनमध्ये विमानतळ व्यवस्थापक धीरेन भोसले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पत्र कुणी आणि कुठून पाठवलं याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. शिर्डी विमानतळावर सुरक्षा व्यवस्था …

शिर्डी विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : निनावी पत्राद्वारे शिर्डी विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पोस्टाद्वारे आलेल्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. राहाता पोलीस स्टेशनमध्ये विमानतळ व्यवस्थापक धीरेन भोसले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पत्र कुणी आणि कुठून पाठवलं याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

शिर्डी विमानतळावर सुरक्षा व्यवस्था अगोदरपासूनच चोख आहे. पण तरीही सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे. देशातील विविध भागातून भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात, त्यामुळे या विमानतळावर नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.

1 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या विमानतळामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. शिर्डी विमानतळ शहरापासून अवघ्या 15 किमी अंतरावर आहे.

शिर्डीहून मुंबई, दिल्ली, बंगळुरु आणि हैदराबादसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. या सर्व 22 आसनी विमानांची जाणे आणि येणे अशी दररोज एक ट्रिप होते. सुरुवातीपासूनच शिर्डी विमानतळाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *