दहशतीचे वातावरण निर्माण करणारे अस्वलाला वन विभागाच्या ताब्यात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महाराष्ट्रात सध्या जंगलातील अनेक प्राणी शेतात दिसत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. त्यांना तात्काळ जेरबंद करण्यात यावं अशी सुद्धा मागणी केली जात आहे.

दहशतीचे वातावरण निर्माण करणारे अस्वलाला वन विभागाच्या ताब्यात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
अस्वलाला घेतलं ताब्यात
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 31, 2023 | 3:14 PM

बुलढाणा : खामगाव (Khamgaon) तालुक्यातील कोलोरी परिसरात गेल्या काही दिवसापासून अस्वलाने (Bears) धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर हे अस्वल खामगाव वन परिक्षेत्रातील (forrst) जनुना बीट मधील कोलोरी गावाच्या शिवारात एका मक्याचे शेतात बसून असल्याची माहिती बुलडाणा (buldhana) वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला मिळाली. काही वेळात रेस्क्यू पथक मोक्यावर पोहचले, परंतु आजूबाजूच्या बऱ्याच अंतरापर्यंत जंगल नसल्याने अस्वलाला ट्रांक्युलाईज करण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदुकीच्या मदतीने अस्वलाला बेशुद्धीचे इंजेक्शन मारल्याने काही वेळातच अस्वल बेशुद्ध झाले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात बंद करून खामगाव वनविभागाच्या कार्यलयावर आणण्यात आले आहे, वैद्यकीय तपासणीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या अस्वलाला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती रेस्क्यू टीमने दिली आहे.

महाराष्ट्रात सध्या जंगलातील अनेक प्राणी दिसत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. त्यांना तात्काळ जेरबंद करण्यात यावं अशी सुद्धा मागणी केली जात आहे. बिबट्याने शेतात लपून पाळीव प्राणी मनु्ष्यावरती अनेकदा हल्ले केले आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या सुमारास घरात घुसून हल्ले केले आहेत. त्यामुळे बिबट्याची दहशत सध्या मोठ्या प्रमाणात आहे.

गव्यांचे पश्चिम महाराष्ट्रात सुध्दा प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांना सुध्दा हुसकवण्याची जबाबदारी वनविभागाकडे आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गवा प्राणी अधिक पाहायला मिळतो. त्याचबरोबर रब्बी हंगामातील अनेक पीकांचं नुकसान गव्याने केलं आहे.

बिबट्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे शेतकरी शेतामध्ये जात असताना घाबरत आहेत. बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस अनेकदा बिबट्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे.  शेताला पाणी पाजण्यासाठी रात्री गेल्यानंतर पुण्यातील एका शेतकऱ्यांवरती जोरदार हल्ला केला होता.