Video Buldana Fire | बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

| Updated on: Apr 07, 2022 | 4:01 PM

विदर्भात आग लागण्याचे सत्र गेल्या दोन दिवसांपासून सुरूच आहे. काल तीन ठिकाणी आग लागली होती. आज पुन्हा चार ठिकाणी आग लागली. नागपुरात मोठं नुकसान झालंय. बुलडाण्यात मंडप डेकोरेशनचं गोदामचं जळालं. वाशिम जिल्ह्यात जंगलातही आग लागली.

Video Buldana Fire | बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान
बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग लागली.
Image Credit source: tv 9
Follow us on

बुलडाणा शहरातील साईनगर, पंधाडे कॉर्नरजवळील सचिन शेळके यांच्या श्री साई मंडप डेकोरेशनच्या (Sri Sai Mandap Decoration) गोदामाला आग लागल्याची घटना घडलीय. यामध्ये मंडप डेकोरेशनचे स्टेज, सोपे, गेट, पडदे, गालीचे, गाद्या, इंदुरी मंडप, चुनरी मंडप सह इतर साहित्य जळाले. अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलीस (Buldana City Police) घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. अग्निशमन दलाने (Fire Brigade ) ही आग विझविण्याचे काम काम केलंय.

दोन लाख रुपये देण्याची घोषणा

बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तात्काळ पंचनामा करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. सचिन शेळके यांना पुन्हा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

पाहा व्हिडीओ

वाशिममध्ये काटेपूर्णा जंगलाला आग

वाशिम जिल्ह्यातील वनोजा इथल्या काटेपूर्णा जंगलाला आग लागली आहे. आग विझविण्यासाठी कारंजा व मंगरूळपीर नगरपरिषद येथील फायर ब्रिगेड गाडी घटनास्थळी दाखल झाली. ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विदर्भात आगीचे सत्र संपविण्याचे काही नाव घेत नाही. काल अकोला, यवतमाळ, वाशिम या तीन ठिकाणी आग लागली. आजही आगीचे सत्र सुरूच आहे. नागपुरात लकडगंज परिसरात भीषण आग लागली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदुरात इलेक्ट्रिक गाडी पेटली. बुलडाण्यापाठोपाठ वाशिममध्येही आग लागली. आजची ही आग लागण्याची चौथी घटना आहे.

Nagpur Crime | नोकरीच्या निमित्ताने शहरात आणले, बलात्कार करून देहव्यापारात ढकलले, चार आरोपी जेरबंद

Video Chandrapur leopard | बिबट्या आला रे आला! चंद्रपुरात रात्री घरात शिरला बिबट्या, पिंजराबंद करण्यात यश

Video Nagpur Fire | नागपुरात आरा मशीनला भीषण आग, आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या रवाना