चिखलीत मनसे कार्यकर्ते ताब्यात, पोलिसांनी सोडले बुलढाणा जिल्ह्याबाहेर

| Updated on: Nov 18, 2022 | 5:24 PM

जालना जिल्ह्याच्या हद्दीत या मनसे सैनिकांना सोडले जाणार आहे. द

चिखलीत मनसे कार्यकर्ते ताब्यात, पोलिसांनी सोडले बुलढाणा जिल्ह्याबाहेर
Follow us on

बुलढाणा : वि. दा. सावरकर यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. शेगावच्या सभेमध्ये मनसेकडून निषेध केला जाणार होता.  राहुल गांधी यांची थोड्या वेळात सभा होणार आहे. ही सभा होण्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आता त्यांना बुलढाणा जिल्ह्याबाहेर पोलीस सोडणार आहेत. काल राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर मनसे सैनिक एकवटले होते.

मनसे सैनिक म्हणाले, आम्हाला जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न पोलीस करताहेत. ते आम्हाला जिल्ह्याच्या बाहेर सोडणार. पोलिसांची पूर्णपणे दडपशाही याठिकाणी सुरू आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं मनसे पदाधिकारी यांनी सांगितलं. आमचं म्हणणं आम्हाला मांडू द्यावं, असंही त्यांनी सांगितलं.

शंभर ते सव्वासेच्या जवळपास मनसे कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस बुलढाण्याच्या हद्दीच्या बाहेर सोडण्यासाठी निघाले होते. जालना जिल्ह्याच्या हद्दीत या मनसे सैनिकांना सोडले जाणार आहे. दोन बसमधून मनसे सैनिकांना जालना जिल्ह्यात सोडण्यात आले. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यासह अन्य कार्यकर्त्यांचा यात समावेश होता.

चिखलीपर्यंत मनसे कार्यकर्ते पोहचले होते. मनसे कार्यकर्त्यांना निदर्शनं करायची होती. पण, ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

सावरकरांवरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते राज्यभरातून आले होते. मनसे कार्यकर्त्यांना बुलढाणा जिल्ह्याबाहेर नेण्यात आले. दुसरीकडं शेगाव येथे काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांची सभा ऐकण्यासाठी उपस्थित झालेत.

राहुल गांधी यांची थोड्यात वेळात शेगावात सभा सुरू होईल. ते या सभेत काय बोलतात, हे ऐकावं लागेल. मनसे कार्यकर्ते हे ही सभा उधळून लावण्याच्या उद्देशानं पोहचले असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय.