दिल गार्डन गार्डन हो गया…गमाडी गंमत, नाशिकमध्ये साकारली फुलपाखरांची बाग!

बिबट्या आणि माणूस हा संघर्ष नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून तर नाशिक जिल्ह्यात बिबट्याचे अक्षरशः थैमान सुरू आहे. हे पाहता निफाड येथे एक हेक्टर परिसरात मानव बिबट्या सहजीवन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या केंद्राचे उद्घाटन केले.

दिल गार्डन गार्डन हो गया...गमाडी गंमत, नाशिकमध्ये साकारली फुलपाखरांची बाग!
निफाडमधील अनोख्या वनोद्यानाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उद्घाटन केले.
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 1:04 PM

नाशिकः बिबट्या आणि माणूस हा संघर्ष नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून तर नाशिक जिल्ह्यात बिबट्याचे अक्षरशः थैमान सुरू आहे. हे पाहता निफाड येथे एक हेक्टर परिसरात मानव बिबट्या सहजीवन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या केंद्राचे उद्घाटन केले.

निफाडमध्ये सुरू केलेल्या या उद्यानामध्ये प्राणिमात्रांचा अधिवास दाखविण्यात आला आहे. एक हेक्टरमध्ये उभारण्यात आलेल्या या उद्यानातल्या चिल्ड्रन पार्कमध्ये विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. विविध सापांच्या जातींची माहिती देण्यासाठी रोटन पार्क (सर्प जाती माहिती केंद्र), निफाड मानव बिबट संघर्ष माहिती केंद्र, ताडोबाचा वाघ, नांदूरमध्यमेश्वर परिसंस्था, ममदापूर राखीव संवर्धन परिसंस्था, फुलपाखरू गार्डन, राशी वन, ग्रीन जिम, औषधी वनस्पती असे सुंदर उद्यान याठिकाणी उभारण्यात आले आहे. अतिशय कमी वेळात व कमी खर्चात उभारण्यात आलेल्या या आकर्षक व माहितीपूर्ण उद्यान निमिर्तीसाठी वन विभागतील अधिकारी व कर्मचारी यांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले आहे.

भुजबळांनी केले कौतुक

देशपातळीवर आदर्श ठरेल असे निफाड तालुक्यात वनविभागाने वन उद्यान तयार केले आहे. या वन उद्यानाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले. ते म्हणाले, जंगलक्षेत्र कमी झाल्याने वन्यजीवांचे मनुष्य वस्तीकडे स्थलांतर होत आहे. परिणामी मानव वन्यप्राणी संघर्ष वाढल्याचे पाहवयास मिळते. भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष रोखण्यासाठी मानवाला वन्यप्राण्यांसोबत सहजीवनाची कास धरावी लागणार आहे. नागरिकांना निसर्ग जवळून समजुन घेता यावा व भावी पिढीला निसर्गाबाबत अधिक सजगता यावी, यासाठी हे उद्यान वरदान ठरणार आहे. तसेच जिल्ह्यात वन पर्यटनाचा विकास केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे.

उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव

आमदार दिलीप बनकर म्हणले की, भविष्यात या वन उद्यानाच्या माध्यमातून शाळेतील मुलांना पुस्तकी माहिती सोबतच प्रत्यक्षात वन्य प्राणी व पक्षी यांच्या संदर्भात माहिती मिळणार आहे. त्यामुळे हे उद्यान येणाऱ्या भावी पिढीसाठी देखील माहितीपूर्ण आकर्षणाचा बिंदू ठरेल. कार्यक्रमात वन विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच मनमाड वन परिक्षेत्र ,राजापूर परिमंडळ वन परिक्षेत्र येवला, नांदगाव वनपरिक्षेत्र व चांदवड वनपरिक्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते गौरविण्यात आले आहे.

इतर बातम्याः

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अतिवृष्टी अनुदान वाटपात घोळ; निधी येऊनही अतिरिक्त 29 कोटींची मागणी, चौकशीचे लचांड

हेल्मेट मोहिमेत खोडा घालणाऱ्या पेट्रोल पंपांना नोटीस; नाशिकचे पोलीस आयुक्त आक्रमक