अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यावरुन मिटकरी-पडळकर यांच्यात हमरी-तुमरी, संपूर्ण वाद जसाच्या तसा

| Updated on: Feb 12, 2021 | 1:33 PM

गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी यांनी हमरीतुमरीवर येऊन एकमेकांना आरे तुरेची भाषा वापरली. तो पूर्ण वाद जशास तसा. (Gopichand Padalkar Amol Mitkari Ahilyabai Holkar )

अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यावरुन मिटकरी-पडळकर यांच्यात हमरी-तुमरी, संपूर्ण वाद जसाच्या तसा
गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी
Follow us on

मुंबई : जेजुरीतल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळाच्या हस्ते केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते.मात्र, त्याआधीच पडळकर यांनी आज (12 फ्रेब्रुवारी) या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर या मुद्द्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा वाद पेटल्याचं दिसतंय. त्यातच ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातही मोठा वाद झाला. हा वाद एवढा पेटला की, दोन्ही आमदारांनी हमरीतुमरीवर येऊन एकमेकांना आरे तुरेची भाषा वापरली. तो पूर्ण वाद जशास तसा. (calsh between Gopichand Padalkar and Amol Mitkari on Ahilyabai Holkar statue Unveiling)

गोपीचंद पडळकर – अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्तानात आहे. इतिहासात नोंद घेणारं त्यांचं काम आहे. त्यांचं मंदिराच्याबाबत जिर्णोद्धार असो, प्रजाहितकारी म्हणून त्यांची जगभर कीर्ती आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचं अनावरण हे चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हायला हवं ही आमची इच्छा होती. परंतु ज्यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं होतं, ते शरद पवारांचं वागणं, विचार हे अहिल्यादेवींच्या उलट आहे. त्यामुळे आम्ही युवा मित्रांनी मेंढपाळ्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण पहाटे साडे पाच वाजता केलं.

प्रश्न – तुमच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे.

गोपीचंद पडळकर – अहिल्यादेवींचा अपमान जिथे होत असेल, तिथे आम्ही यापेक्षा तीव्रपणे काम करु. ज्यांना गुन्हे दाखल करायचे आहेत ते करु द्या. पवारांनी आतापर्यंत गुन्हे घालणं हेच केलं. त्यांचं मी स्वागत करतो. त्यांनी मला जेलमध्ये टाकावं, मला काहीच फरक पडत नाही. मला शिक्षा करावी, पण अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पवारांच्या कुटुंबातील कुणीच लावू नये अशी आमची भूमिका यापूर्वीही राहिली आहे, यापुढेही राहील.

प्रश्न – पण एवढा राग का?

गोपीचंद पडळकर – गेल्या तीन महिन्यांपासून जे यशवंतराव होळकर इंग्रजांविरोधात लढले, 18 वेळा इंग्रजांना हरवले, त्यांचा जो वाडा आहे, तो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. हा वाडा सरकारच्या ताब्यात द्यावा ही मागणी मी सभागृहात केली होती. सरकारने त्याचं संवर्धित स्मारक म्हणून जाहीर करुन डागडुजी करावी, अशीही मी मागणी केली होती. पण रयतचे अध्यक्ष शरद पवार त्यावर बोलत नाहीत, त्यांना होळकरांच्या वास्तू नेस्तनाबूत करायच्या आहेत. होळकरांचा इतिहास त्यांना ठेवायचा नाही. दुसऱ्या बाजूला अहिल्यादेवी संस्थानाने जो पुतळा बांधला आहे, त्यामध्ये राजकारण करत आहेत, जातीवाद करत आहेत. होळकरांचे वारस इथे पूर्वीपासून आहेत. पवारांनी घराघरात भांडणं लावली. आता ते होळकरांच्या घरात लावत आहेत.

प्रश्न – याबाबत आपण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना विचारु

अमोल मिटकरी : गनिमी कावा म्हणून तुम्ही मावळ्यांचा अवमान करु नका. गनिमी कावा हे मुत्सद्दी मावळेच करायचे. गोपीचंद पडळकरांना तितकी अक्कल असेल असं वाटत नाही. गोपीचंद पडळकर ही वृत्ती नाही तर प्रवृत्ती आहे. एखादा माणूस पिसाळल्यावर जसं बोलतो त्याचं उदाहरण हे पडळकर आहेत. यांनी आम्हाला अहिल्यामाई होळकर यांच्याबद्दल सांगू नये. हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत. शरद पावारांची भूमिका ही सर्वसमावेश राहिलेली आहे. एखाद्या चोरासारखं जाणं, पुतळ्याचं अनावरण करणं म्हणजे मीच कसा अहिल्यामाईंचा वारसदार आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आताच्या काळातले हे शिशुपाल आहेत. हे वाचाळवीर आहेत. त्यांना काही गांभिर्याने घेण्याची गरज नाही.

पडळकर – शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं भाषण गोरगरीब, बहुजनांच्या मुलांना 1 लाख रुपयांना विकणारा हा माणूस आहे. भाषण विकण्यासाठी या माणसाने चार पुस्तकं वाचली.

मिटकरी- ऐ..ऐ.. अरे तुरेची भाषा कुणाला करतोय? भाषी निट पापर. जरा निट बोल. तु दिलेत का मला पैसै? पैसे घेऊन भाषण केल्याचा एक तरी पुरावा या पडळकरने दाखवावा. तुझ्यासारखा मी समाज विकला नाही. भाषा निट वापर जरा. तुझ्यासारख्या शिषुपालाने मला सांगण्याची गरज नाही. तु पाहिलं का मला पैसे घेताना?.

पडळकर मी भाषा निटच वापरतोय. असल्या बाजारू विचारवंतानी मला सल्ला देण्याची गरज नाही. मी सक्षम आहे !

मिटकरी- याला पिवळ्या रोग झाला आहे. त्यामुळे हा असल्या वाह्यात गोष्टी करतोय. हा एक दिवस संपूर्ण भाजप बुडवणार !

पडळकर- तुम्हालाच पिवळ्या रोग झाला असेल. या रोगामध्ये राष्ट्रवादी संपणार आहे. हे लक्षात ठेवा. जातीयवादी राष्ट्रवादी यात संपणार आहे. हे लक्षात ठेवा. हे सारं संपूर्ण माहाराष्ट्र पाहतो आहे. असल्या विचारांची महाराष्ट्राला गरज नाही. आम्ही सक्षम आहोत !

मिटकरी- माझ्यासोबत जास्त मस्तीची भाषा करायची नाही. हा एक दिवस पूर्ण भाजप बुडवणार आहे. गोपीचंद पडळकरनी 1 लाख रुपये घेऊन व्याख्यान देतो, हे सिद्ध करुन दाखवावं !

पडळकर- ये निट बोल. आरे तुरे कोणाला करतोय?. निट बोल !

मिटकरी- चोरांसारखे धंदे बंद करा. पवार साहेबांची बरोबरी करायला कित्येक जन्म घ्यावे लागतील !

पडळकर- पवार साहेबांना सांगा की यशवंतरावांचा वाडा हा सराकरडे द्या म्हणून. होळकरांच्या सगळ्या वास्तू नेस्तनाबूत करण्याचा उद्योग तुम्ही करत आहात !

मिटकरी- होळकराचा वारसा काय एका फक्त पडळकर नावाच्या शिशुपालानेच घेतलाय का?

पडळकर– आम्ही तुमचा डाव उधळतो आहोत. तुमचं षडयंत्र आम्ही उद्ध्वस करतोय !

मिटकरी- डिपॉझिट जप्त झालंय ना बारामतीमध्ये. यावरुन लायकी समजून यायला पाहिजे. तरी बेशरमासारखी आमदाराची पदं पदरात पाडून घेतात. स्वाभिमान असता तर हिमालयात जाऊन बसला असता तिथे !

पडळकर- डिपॉझिट हे लोकं घालवतात. तु कधी लढलास निवडणूक. कुठल्यातरी समाजाला शिव्या द्यायच्या आणि आरेरावी मिरवायची असले धंदे आम्ही करत नाही !

मिटकरी- आरेरावी नाही. आहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आम्हाला शिकवू नका. आमच्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा धनगर समाजाला या मिटकरीने नेतृत्व दिलं आहे. तु वारसा शिकवायची गरज नाही. ज्याचे डिपॉझिट जप्त झालंय त्याने सन्यास घ्यावा. हे चोरासारखे धंदे बंद करावे. नाहीतर समाज माफ करणार नाही !

पडळकर- पवारांच्या छाताडावर उभं राहून मी निवडणूक लढवली आहे. माझं डिपॉझिट जरी जप्त झालं असेल, तरी मी लेचापेचा नाही !

मिटकरी- तुझी औकात किती?,तू बोलतोस किती ?

पडळकर- माझी औकात लोकांना माहिती आहे. तुझी औकात काय त्याचं बघ तू !

मिटकरी- तु कोणाला बोलतयोस, कोणाबद्दबल बोलतोस !

पडळकर- ये.. कोणाला आरोतुरे बोलतोस तू. तुझ्यासारख्या बाजारू लोकांची मला गरज नाही !

मिटकरी- बिरोबाची शपथ घेऊन तू समाजाला भुलवलंस. समाज तुला कधी माफ करणार नाही !

पडळकर- माझा समाज मला बघून घेईल. तुझ्यासारख्यांनी मला सांगायची गरज नाही !

मिटकरी- आरे जा.. जा… तुझ्यासारखे 56 पाहिलेत. तु काय छाताडावर उभं राहायची भाषा करतो का?

पडळकर- तुम्हा सगळ्यांना नेस्तनाबुत केल्याशिवाय कुठं जात नाही. तू टेन्शन नको घेऊ !

मिटकरी- असे भरपूर पाहीले. जरा निट बोल. भाषा जरा निट वापर !

पडळकर- अरे तू कोणाशी बोलतोय. तू आरेतुरे बोलला. मी आरेतुरे बोलत नाही. तू कोण लागून गेलास रे !

मिटकरी- अरे तू कोणाशी बोलतोय?, कोणाविरुद्ध बोलतोय ?. तुझ्यासारखी प्रवृत्ती महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे !

पाहा संभाषणाचा संपूर्ण व्हिडीओ :

इतर बातम्या :

पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब; पडळकरांचा घणाघात

(calsh between Gopichand Padalkar and Amol Mitkari on Ahilyabai Holkar statue Unveiling)