‘अवनी’चे बछडे सुखरुप, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा भागातील टी-1 म्हणजे अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर तिचे बछडे कसे आहेत, याची सर्वांनाच उत्सुकता व काळजी होती. आता तिचे बछडे 11 महिन्यांचे असून, ते 12 दिवसांनंतर वन विभागाच्या पथकाला आढळून आले आहेत.  दोन दिवसांपूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यात अवनीचे बछडे बंदिस्त झाले आहेत. अवनीच्या बछड्यांचे फोटो सुद्धा सध्या व्हायरल होत आआहेत. हे बछडे […]

अवनीचे बछडे सुखरुप, ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा भागातील टी-1 म्हणजे अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर तिचे बछडे कसे आहेत, याची सर्वांनाच उत्सुकता व काळजी होती. आता तिचे बछडे 11 महिन्यांचे असून, ते 12 दिवसांनंतर वन विभागाच्या पथकाला आढळून आले आहेत.  दोन दिवसांपूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यात अवनीचे बछडे बंदिस्त झाले आहेत.

अवनीच्या बछड्यांचे फोटो सुद्धा सध्या व्हायरल होत आआहेत. हे बछडे 11 महिन्यांचे असून ते सुखरुप आणि सुदृढ आहेत. दोन दिवसांपूर्वी विहीरगाव परिसरात हे बछडे मोबाईल स्कॉड सर्च टीमला दिसून आले होते. त्यानंतर त्या लगतच्या परिसरातील ट्रॅप कॅमेरा शोधले असता, लोणी जवळील बिट क्रमांक 652 मधून जाताना ट्रॅप कॅमेऱ्यात हे बछडे दिसून आले. वनविकास महामंडळचे विभागीय व्यवस्थापक प्रकाश वाघ यांनी याबाबत दिली.

आज या बछड्यांच्या शोध मोहिमेसाठी भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून येथील डॉ. बिलाल हे या भागात दाखल झाले आहेत. त्यांनी आज यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली. विहीरगाव लोणी या भागामध्ये बछड्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 13 जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक अवनी वाघिणीला 2 नोव्हेंबर 2018 रोजी राज्याच्या वनविभागने शार्पशूटरना बोलावून ठार केले. अवनीला ठार करण्यासाठी वनविभागने खूप प्रयत्न केले होते. अखेर 2 नोव्हेंबरला अवनीला ठार करण्यात यश आले. त्यानंतर प्राणीप्रेमींनी वनमंत्री सुधीर मुगंटीवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली.

त्यानंतर अवनीच्या बछड्यांबद्दलही अनेकांनी काळजी व्यक्त केली. अवनीच्या 11 महिन्यांच्या बछड्यांचे नेमके काय झाले असेल, असा काळजीयुक्त प्रश्न सगळ्यांनाच सतावत होता. अखेर वनविभागागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात अवनीचे बछडे कैद झाले आहेत आणि ते सुखरुप असल्याचे समोर आले आहे.