शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल..

बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा अडचणीत सापडले आहेत. संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी आपली शेतजमीन हडपून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली होती

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल..
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 3:01 PM

बुलढाणा | 29 फेब्रुवारी 2024 : बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा अडचणीत सापडले आहेत. संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी आपली शेतजमीन हडपून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्याप्रकरणी गायकवाड तसेच त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात त्यांची दीड एकर शेती आहे. आमदार गायकवाड यांनी २०२१मध्ये त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले. तसेच त्या शेतावर अवैधरीत्या फार्महाऊसही बांधले, असा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. आम्ही जेव्हा त्यावर आक्षेप घेतला, तेव्हा मला जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तसेच ही शेतजमीन कवडीमोल भावाला विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. तसं न केल्यास आपल्याला जिवे मारण्यात येईल अशी धमकी गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप महिलेने याचिकेत केला होता.

त्यानंतर मोताळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गायकवाड व इतर चौघांविरोधात 156 ( ३ ) नुसार १४३, १५०, ३७९, ३८५, ४४७ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

यापूर्वीही सापडले होते वादात

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शिवजंयतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखातीत आपण १९९७ मध्ये वाघाची शिकार केली होती. त्याच्या दात गळ्यात बांधला आहे. बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले होते. मात्र त्यामुळे ते पुन्हा वादात सापडले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.