AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : दिशा सालियान प्रकरणात CBI कडून गुन्हा दाखल, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंवर आरोप काय? वाचा A टू Z

दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्या दिवशी दिशा राहत असलेल्या फ्लॅटवर पार्टीही झाली होती. पण दिशाच्या वडिलांनी दिशाच्या मृत्यूचं कनेक्शन हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलंय. दिशा सालियान ही सुशांत सिंहची माजी मॅनेजर होती. दिशाचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला तर 6 दिवसांनी 14 जूनला सुशांत सिंहचा मृतदेह त्याच्या घरात आढळला.

Explainer : दिशा सालियान प्रकरणात CBI कडून गुन्हा दाखल, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंवर आरोप काय? वाचा A टू Z
disha salian and aditya thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 1:57 PM
Share

Disha Salian Death Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात CBI ने आता गुन्हा दाखल केलाय. दिशाच्या वडिलांनी जबाबात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय. दिशाच्या वडिलांनी या बड्या नेत्यांची नावे घेतलेली असली तरीही CBIच्या FIR कॉपीत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नावच नाही. सीबीआयने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळेच आता दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी काय आरोप केला? सीबीआयच्या एफआयआरमध्ये नेमके काय आहे? तसेच भविष्यात या प्रकरणात काय होऊ शकते, ते जाणून घेऊ या..

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची CBIकडून चौकशी होणार?

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठोस पुरावे मिळाल्यावर CBI त्याप्रमाणे कारवाई करणार आहे. सामूहिक बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करणे अशी कलमं या प्रकरणात लावण्यात आली आहेत. जबाब नोंदवताना दिशाचे वडील सतीश सालियान यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, रोहन रॉय, अभिनेता डिनो मोरया, अभिनेता सूरज पांचोली, परमबीर सिंह, सचिन वाझे यांची नावं घेतली आहेत. आता दिशाच्या वडिलांच्या आरोपांनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची CBIकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. दूध का दूध झालं पाहिजे, आदित्य ठाकरे दोषी आहेत का याचा तपास करा अशी मागणी त्यांनी केलीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आलंय.

सतीश सालियान यांनी काय काय आरोप केले?

दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी CBIकडे जबाब नोंदवला. या जबाबात धक्कादायक दावे केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांनी या प्रकरणावर पांघरुण घालण्यात महत्वाची भूमिका बजावली. कागदपत्र, फाईल्स, इतर सार्वजनिक रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला. दिशाच्या विरोधात गुन्हेगारी कट आणि त्यानंतर आत्महत्येची खोटी कहाणी तयार केली. त्यासाठी आदित्य ठाकरे, रोहन रॉय, डिनो मोरया, सूरज पांचोली, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, सचिन वाझे, परमबीर सिंह जबाबदार आहेत. त्यांच्या भूमिकेची चौकशी होणं आवश्यक आहे, असं सतीश सालियान आपल्या जबाबात म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे हे ड्रग्जच्या धंद्यात होते- वकिलाचा आरोप

दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्या दिवशी दिशा राहत असलेल्या फ्लॅटवर पार्टीही झाली होती. पण दिशाच्या वडिलांनी दिशाच्या मृत्यूचं कनेक्शन हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलंय. दिशा सालियान ही सुशांत सिंहची माजी मॅनेजर होती. दिशाचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला तर 6 दिवसांनी 14 जूनला सुशांत सिंहचा मृतदेह त्याच्या घरात आढळला. मुलीच्या मृत्यूवरुन सुशांतच्या कुटुंबीयांचा आरोप आदित्य ठाकरेंवर आहे. आदित्य ठाकरे हे ड्रग्जच्या धंद्यात होते. त्याचे व्हिडीओ पुरावे दिशा सालियानने सुशांत सिंहला दिले. सुशांतने रिया चक्रवतीला हे सांगितलं. आणि त्यानंतर दोघांनाही संपवण्यात आलं, असा आरोप दिशा सालियान यांच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी केला. दरम्यान, CBI च्या दाखल गुन्ह्यात सध्यातरी कोणाचेही नाव नाही. CBIने अज्ञात असा उल्लेख केलाय. अर्थात आता CBIकडून तपास होईल आणि त्यानंतर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा