Chandrashekhar Bawankule: पडीक जमीन सरकार ताब्यात घेणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण, कुणाला दिला इशारा?

जमीन खरेदी केल्यानंतर तीन वर्षे तिथे शेती न करता जमीन पडीक ठेवल्यास ती थेट सरकारजमा केली जाणार असल्याचे संकेत राज्याचे महसूलमंत्री मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकार कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणार नाही असं म्हणत कालच्या विधानावरुन स्पष्टीकरण दिले आहे.

Chandrashekhar Bawankule: पडीक जमीन सरकार ताब्यात घेणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण, कुणाला दिला इशारा?
Chandrashekhar Bawankule
| Updated on: Nov 23, 2026 | 4:46 PM

Chandrashekhar Bawankule:  तुमच्याकडेही पडीक जमीन असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. जमीन खरेदी केल्यानंतर तीन वर्षे तिथे शेती न करता जमीन पडीक ठेवल्यास ती थेट सरकारजमा केली जाणार असल्याचे संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. बावनकुळेंच्या या विधानाने शेतकरी तसेच मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकार कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणार नाही असं म्हणत कालच्या विधानावरुन स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणालेत चंद्रशेखर बावनकुळे? 

Loading...

“राज्यात काही लोकांनी फार्मसाठी 50 एकर 100 एकर जमिनी घेतल्या आहेत. अशा जमिनी आठ आठ वर्षांपासून पडीत आहे त्यामुळे देशाचा नुकसान होत आहे. यामध्ये सर्व सामान्य शेतकऱ्याचा काही संबंध नाही हा नियम कुठल्याही सर्वसाधारण शेतकऱ्याला लागू नाही. ज्यांनी जमिनी खरेदी करून लँड बँक तयार केली त्यासाठी हा निर्णय आहे. अशी जमीन छोट्या छोट्या शेतकऱ्यांना भाडेपटाने देता येते,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

तसेच “काही लोकांनी जाणीवपूर्वक अर्थाचा बे अर्थ केला. तीन वर्षे जमीन पिकवली नाही तर शासनाकडे जमा करू हा निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांची कुठलीही जमीन सरकार ताब्यात घेणार नाही. माझ्या कालच्या बोलण्याचा अर्थ काही राजकीय नेत्यांनी चुकीचा अर्थ काढला,” असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा नियम शेतकऱ्यांसाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

नागपूरमध्ये बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडीक जमिनींबाबत महत्त्वाचे विधान केले होते. अनेकदा व्यापारी तसेच व्यावसायिक भविष्यात फायदा मिळवण्यासाठी शेतजमिनी विकत घेतात आणि त्या तशाच पडीक ठेवतात. पावसाअभावी किंवा दुष्काळ असल्याने जमीन पडीक राहणे ही वेगळी बाब आहे. मात्र पाऊस आणि पाणी असूनही जमीन शेतीविना पडीक ठेवणे योग्य नाही. नियमानुसार तीनवर्षांपेक्षा जास्त काळ जमीन पडीक ठेवता येत नाही, असं ते म्हणाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us