भुजबळ, वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आणि मंत्र्यांकडून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचा वाद आता राज्यपालांच्या दरबारात पोहोचला आहे. (chhagan bhujbal and vijay wadettiwar should Removed From maharashtra cabinet)

भुजबळ, वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आणि मंत्र्यांकडून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचा वाद आता राज्यपालांच्या दरबारात पोहोचला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा समन्वयकांनी राज्यपालांकडे केली आहे. (chhagan bhujbal and vijay wadettiwar should Removed From maharashtra cabinet)

आज मराठा क्रांती मोर्चाच्या 15 समन्वयकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या आंदोलकांनी राज्यपालांकडे आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन दिलं आहे. तसेच भुजबळ आणि वडेट्टीवार यांचीही तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते सातत्याने चुकीची विधाने करून दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. तसं निवेदनही त्यांनी दिलं आहे.

मंत्र्यांकडून होणाऱ्या शेरेबाजीमुळे राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष अटळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी नानासाहेब पाटील, रमेश किरेपाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये मराठा आरक्षणावरून शाब्दिक चकमकी झडत आहेत. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सूर मराठा समाजातून येत आहे. त्याला भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे. ओबीसी आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू देणार नाही, असा इशारा या नेत्यांनी दिला आहे. त्यावर मराठा समाजातील प्रमुख नेत्यांनी आम्हाला ओबीसीतून आरक्षण नकोच आहे, असं स्पष्ट केलं आहे. तरीही दोन्ही समाजातील शाब्दिक चकमकी थांबताना दिसत नाहीये. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोणत्याही समाजाच्या आरक्षणातील एक कणही कमी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. (chhagan bhujbal and vijay wadettiwar should Removed From maharashtra cabinet)

संबंधित बातम्या:

अनेक वर्षे सत्ता, तरी मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

“राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग”

मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, समाजाचं नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना : अशोक चव्हाण

(chhagan bhujbal and vijay wadettiwar should Removed From maharashtra cabinet)

Published On - 12:14 pm, Tue, 29 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI