मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, समाजाचं नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना : अशोक चव्हाण

अशोक चव्हाणांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली. (Ashok Chavan Comment on Maratha Community Reservation Issue) 

मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, समाजाचं नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना : अशोक चव्हाण

मुंबई : “मला कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करायचं नाही. मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. फ़डणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan Comment on Maratha Community Reservation Issue)

नुकतंच सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाण, मंत्री  एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली.

“मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक होती. या बैठकीत गेल्या 10-12 दिवसातील हायकोर्टाचे निर्णय आले आहेत. त्यावर चर्चा झाली. EWS किंवा SCBC या दोघांपैकी एक काहीतरी घ्या, असे कोर्टाने म्हटलं आहे. त्यातील सारांश तरी तेच सांगत आहे. त्यामुळे हायकोर्टाचे निर्णय, EWS बद्दलच्या मागण्या आणि उर्वरित काही मागण्या याबाबत चर्चा झाली,” असे अशोक चव्हाण म्हणाले.

“आज खासदार संभाजीराजेही भेटणार आहेत. त्यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. हा विषय न्यायालयात जाऊन सुटणार आहे, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र आता ते जी भूमिका घेत आहेत, ती फार वेगळी आहे.”

“सुप्रीम कोर्टात चार वेळा लेखी दिलं आहे. कोरोनामुळे कोर्टाची सुनावणीही व्हिडीओद्वारे होतं आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत याला चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील, सरकार मदत करत आहेत,” असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. (Ashok Chavan Comment on Maratha Community Reservation Issue)

संबंधित बातम्या : 

पक्ष सोडताना दिल्लीवरुन फोन, पक्ष का सोडता अशी विचारणा : एकनाथ खडसे

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका

Published On - 1:48 pm, Wed, 2 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI