“राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग”

मराठा आरक्षण तसेच इतर अनेक बाबतीत राज्य सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. (Sudhir Mungantiwar Maratha reservation)

"राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग"

नागपूर :मराठा आरक्षण तसेच इतर अनेक बाबतीत राज्य सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे.” अशी टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्य सरकारवर केली. ते नागपूरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं. (Sudhir Mungantiwar criticizes state government on Maratha reservation issue)

“मराठा आरक्षण असो किंवा इतर बाबी, राज्य सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाची जबाबदारी पूर्ण केली होती. पण या सरकारने मराठा आरक्षणावर 365 प्रश्न निर्माण केले. या सरकारने आरक्षण कोर्टात टिकवलं नाही,” असा आरोप मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

उदयनराजेंच्या वक्तव्याला समर्थन

खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी (29 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण लवकरात लवकर देण्याची मागणी केली. तसेच त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. याबाबत विचारले असता, त्यांनी उदयनराजे भोसलेंची पाठराखण केली. “उदयनराजे यांनी राजघराण्यातील व्यक्ती म्हणून नाही, तर सामान्य जनतेच्या मुखातील प्रश्न मांडला. उदयनराजे जे बोलतात ते खरं आहे,” असं ते म्हणाले.

मराठा आरक्षणावरुन रावसाहेब दानवेंचीही टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील राज्य सरकारला लक्ष्य केले. “मराठा आरक्षण हा राज्याचा कायदा आहे. याचा केंद्राशी काहीही संबंध नाही. पण तरीही केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे,” असे म्हणत दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला घेरलं. तसेच, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात सहकार्य करत नसल्याची माहिती अ‌ॅड. मुकूल रोहतगी यांनी दिलेली आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

उदयनराजेंना बोलायचं ते बोलू द्या, मराठा आरक्षणाबद्दल सरकार गंभीर, शिवसेनेचं उत्तर

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

(Sudhir Mungantiwar criticizes state government on Maratha reservation issue)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI