उदयनराजेंना बोलायचं ते बोलू द्या, मराठा आरक्षणाबद्दल सरकार गंभीर, शिवसेनेचं उत्तर

राज्यात कुणाला जे बोलायचं ते बोलूद्या, राज्य सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर आहे. असे उत्तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले.

उदयनराजेंना बोलायचं ते बोलू द्या, मराठा आरक्षणाबद्दल सरकार गंभीर, शिवसेनेचं उत्तर
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 4:15 PM

वाशिम : “राज्यात कुणाला जे बोलायचं ते बोलूद्या, राज्य सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर आहे,” असे प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी उदयनराजे भोसले यांना दिले. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी रविवारी (29 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरलं. यावेळी त्यांच्या पाठीमागच्या बॅनरवर ‘मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं!’ असं लिहिलं होतं. याबद्दल विचारले असता अरविंद सावंत यांनी वरील उत्तर दिलं. ते वाशिममध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Arvind Sawant replied to Udayanraje Bhosale on maratha reservation)

“मराठा आरक्षण मागण्याची गरज नाही. ज्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. राज्य सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर आहे,” असे ते म्हणाले. तसेच, न्यायालयाकडून जेव्हा निर्णय येईल तो मजबुतीने मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल, असेही अरविंद सावंत म्हणाले.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच मुद्द्यावरुन उदयनराजे भासले यांनी रविवारी (29 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवले. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कुठलीही पाऊल उचललं नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या पाठीमागे एक खास बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर ‘मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं!’ असं लिहिण्यात आलं होतं. त्यांच्या या खास बॅनरच्या आधारे उदयनराजे मराठा आरक्षणावरुन आक्रमक झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या याच बॅनवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मराठा आरक्षण मागण्याची गरज नाही. ज्यांना जे बोलायचं ते सांगून द्या. राज्य सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर आहे, असं उत्तर दिलं.

उदयनराजे काय म्हणाले ?

‘मराठ्यांचे कैवारी ही उपमा तुम्हाला शोभते का?

मराठ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्यांना ही उपमा किती शोभा देते? असा सवालही उदयनराजे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही मराठा नेत्यांना विचारला आहे. यावेळी त्यांनी नाव घेणं मात्र टाळलं. पण त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होता, अशी चर्चा आता सुरु आहे. दरम्यान, हा प्रश्न विचारताना आपल्या कुणीही शत्रू नाही. मग ते पवार साहेब असतील किंवा अन्य कुणी, असंही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे. (Arvind Sawant replied to Udayanraje Bhosale on maratha reservation)

आज मराठा म्हणून बोलत नाही- उदयनराजे

आपण मराठा समाजात जन्माला आलो असलो तरी आज मराठा म्हणून बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजातील व्यक्तीला न्याय मिळायला हवा, या भूमिकेतून मुद्दे मांडत असल्याचं उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यातील सत्ताधाऱ्यांनीच मार्गी लावला पाहिजे, कारण त्यांनीच हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याचा घणाघातही उदयनराजेंनी यावेळी केला.

राज्यात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप करतानाच अन्य समाजाचे अधिकार, त्यांचं आरक्षण अबाधित ठेवा, पण मराठा समाजावर अन्याय का? असा प्रश्नही उदयनराजे यांनी विचारला आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत जेवढे मराठा आणि अन्य समाजाचे खासदार-आमदार आहेत, त्या सर्वांची मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी असल्याचं आवाहनही उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे.

संबंधित बातम्या

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल

(Arvind Sawant replied to Udayanraje Bhosale on maratha reservation)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.