अनेक वर्षे सत्ता, तरी मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही," अशी टीका पंकजा मुंडे केली. (Pankaja Munde Maratha reservation)

अनेक वर्षे सत्ता, तरी मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
pankaja munde

परभणी : राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही,” अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. त्या व्यंकटेश मंगल कार्यालयात विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. (Pankaja Munde on Maratha reservation)

राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होत आहेत. औरंगाबाद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज नेते औरंगाबाद मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पंकजा मुंडे यांनीदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण तसेच सरकारवर टीका केली आहे. (Pankaja Munde on Maratha reservation)

“आमदार सतीश चव्हाण यांनी कधीच पदवीधरांचा प्रश्न मांडला नाही. ते कुठेही मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरले नाहीत. अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही.” असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, पुढे मराठा आरक्षणावर बोलताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. असेही त्या म्हणाल्या.

राज्य सरकारवर टीका

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. “या सरकारवर लोकांची प्रचंड नाराजी आहे. या सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आले आहेत. यांचे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचे उद्दीष्ट आहे, असे वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये खरी लढत

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन औरंगाबाद आणि नागपूरमध्ये आघाडीत बिघाडी? बंडखोरीची शक्यता

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे समर्थकाला औरंगाबादेतून तिकीट

(Pankaja Munde on Maratha reservation)

 

Published On - 6:54 pm, Thu, 26 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI