AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातब्बर नेत्याने पक्ष सोडला, बंडखोरही अडला; औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड

राष्ट्रवादी काँग्रेसने ईश्वर मुंडे यांची समजूत काढून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. | Aurangabad graduate constituency

मातब्बर नेत्याने पक्ष सोडला, बंडखोरही अडला; औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 3:33 PM
Share

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (Aurangabad graduate constituency 2020 ) जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे मनसुबे यंदा धुळीस मिळण्याची शक्यता जास्त आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना या मतदारसंघात भाजपसाठी प्रतिकुल गोष्टी घडताना दिसत आहे. भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा असल्याचे जाहीर केले. (Aurangabad graduate constituency election 2020 battle between bJP and NCP)

यामध्ये भर म्हणून भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोखळे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला नकार दिला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये फूट पडणार, हे स्पष्ट झाले आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ईश्वर मुंडे यांची समजूत काढून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण निश्चिंत झाले आहेत. महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक अगोदरपासूनच भाजपसाठी अवघड मानली जात होती. त्यामध्ये बंडखोरीची भर पडल्याने यंदा भाजपसाठी मराठवाड्याचा गड काबीज करणे जवळपास अशक्यप्राय बाब मानली जात आहे. मात्र, यानंतरही भाजप राजकीय चमत्कार करुन ही लढाई जिंकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मराठवाडा पदवीधरची आमदारकीची जागा गेल्या दोन निवडणूका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ती खेचून आणण्यासाठी भाजप शक्य ते प्रयत्न करतेय तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी राजकारणातले सगळेच छक्के-पंजे वापरून आपली बाजू भक्कम करतेय. त्यामुळे या लढाईत कोणाचा विजय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भाजपला पाडण्यासाठीच उमेदवारी अर्ज मागे घेतला: जयसिंगराव गायकवाड भाजपला जास्त मस्ती आली आहे आणि त्यांना मी धडा शिकवणारच, असा निर्धार जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी व्यक्त केला आहे. भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत. मात्र, आता मी भाजपला धडा शिकवणार आहे, त्यासाठी भाजपने तयार राहावे, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाचा राजीनामा

मी सलग सहा वेळा निवडून आलो, प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून आमदार व्हावं, खडसेंचं प्रत्युत्तर

केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवलेला मराठवाड्यातील भाजप नेता ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत

(Aurangabad graduate constituency election 2020 battle between bJP and NCP)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.