Sambhajinagar MLC Election Result Updates : महायुतीची झोप उडवणारा ट्विस्ट, संभाजीनगर जागेवर टेन्शन वाढवणारे आकडे; टपाली मतांमुळे चिंता वाढलाी!
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी सध्या मतमोजणी सुरू झाली आहे. टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून केलेल्या मतांपैकी 494 मतं वैध ठरली आहेत. यापैकी 300 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result Update : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल पुढच्या काही तासात पुढे येणार आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीने जोर लावला होता. वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. या जागेवरील विद्यमान आमदार सतीश चव्हाण पुन्हा एकदा रिंगणात आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी चव्हाण यांच्यापुढे चांगले आव्हान उभे केले आहे. दरम्यान, सध्या टपाली मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांमधून प्रतापसिंह पाटील चव्हाण यांच्यात अटीतटीची लढाई होत असल्याचं समोर आलं आहे.
कोणाला किती मतं मिळाली?
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी सध्या मतमोजणी सुरू झाली आहे. टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून केलेल्या मतांपैकी 494 मतं वैध ठरली आहेत. यापैकी 300 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या 300 मतांपैकी 137 मतदान हे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना 100 मतं मिळाली आहेत.
रविराज साबळे यांना किती मतं पडली?
सध्याच्या आकडेवारीनुसार टपाली मतदानात महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण 37 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिलीप घुगे यांनीही या निवडणुकीत चांगला जोर लावला होता. त्यांना फक्त 31 मते मिळाली आहेत. तर अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरलेल्या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर रविराज साबळे यांना 19 मते पडली आहेत.
प्रतापसिंह पाटील गेम पालटणार का?
छत्रपती संभाजीनगरची जागा ही महायुतीसाठी खूप महत्त्वाची आहे. संभाजीनगरच्या पदवीधरच्या निवडणुकीत सतीश चव्हाण हे नेहमीच किंग मानले जातात. परंतु यावेळी त्यांना प्रतापसिंह पाटलांना मोठे चॅलेंज उभे केले आहे. सोबतच अपक्षांमुळेही ही लढत बहुरंगी ठरलीय. सध्यातरी टपाली मतांची मोजणी करण्यात आलीय. पूर्ण मतमोजणी आणखी बाकी आहे. त्यामुळे आकडे कधीही फिरू शकतात. बाजी कधीही पलटू शकते. म्हणूनच पुढे काय काय होणार, चव्हाण आपला गड राखणार की प्रतापसिंह पाटील विजयी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे