Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result Updates : संभाजीनगर पदवीधरमध्ये महायुतीला जबर धक्का, शिंदेंच्या खास माणसानेच गेम केला; किंगमेकर ‘सत्तार’ यांची चर्चा!

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचं चित्र आहे. दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result Updates : संभाजीनगर पदवीधरमध्ये महायुतीला जबर धक्का, शिंदेंच्या खास माणसानेच गेम केला; किंगमेकर सत्तार यांची चर्चा!
abdul sattar and pratapsingh patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 3:22 PM

Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result Updates : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंगघाच्या पाच जागांचा निकाल आता जवळजवळ स्पष्ट झालाय. पुण्याचा शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारलीय. या ठिकाणी शिवसेनेचे सचिन सानप हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, एकीकडे पुण्यात भाजपान बाजी मारलेली असली तरीही छत्रपती संभाजीनगरातील पदवीधर मतदारसंघात मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. येथे महायुतीचे तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या जागेवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेप प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत. त्याचाच विजय आता जवळपास निश्चित मानला जातोय. दरम्यान, हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी प्रतापसिंह पाटील यांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. यातच शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनीही हा विजयोत्सव साजरा करण्याची तयारी चालू केलीय. या निवडणुकीत सत्तार हे किंगमेकर ठरल्याचे बोलले जातेय.

अब्दुल सत्तार किंगमेकर

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचं चित्र आहे. दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रतापसिंह पाटील यांना दिलेला पाठिंबा त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरल्याची चर्चा समर्थकांमध्ये सुरू आहे. मतमोजणी केंद्राबाहेर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्त्यांकडून तयारी करण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता कार्यकर्त्यांनी सत्तार यांचे ‘किंगमेकर’ असे उल्लेख असलेले पोस्टर झळकावत आनंदोत्सवाला सुरुवात केली आहे.

Loading...

अब्दुल सत्तार यांची महत्त्वाची भूमिका

शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महायुतीत असलेल्या अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने या निवडणुकीची राजकीय समीकरणं चर्चेत आली आहेत. त्यामुळे प्रतापसिंह पाटील यांच्या विजयात अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची प्रतिक्रिया समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. आता अधिकृत निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us