Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 LIVE : शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी : राज ठाकरे

यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 LIVE : शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी : राज ठाकरे
शिवनेरीवरील शिव जन्मोत्सव सोहळा
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 10:48 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आणि वाचकांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांच्या जयंतीच्या शुभेच्छा! कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.  बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे शिवेनरीवर दाखल झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी ढोल ताशाच्या गजरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे.