Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त द्या विशेष शुभेच्छा

संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे. यानिमित्त खास शुभेच्छा संदेश आणि प्रेरणादायी कोट्स वाचा. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करा आणि सर्वांसोबत त्यांचे विचार शेअर करू शकता.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त द्या विशेष शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
| Edited By: | Updated on: Feb 19, 2025 | 11:12 AM

केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. 19 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण देशभरात शिवरायांची 395 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात. त्यांचे युद्ध धोरण, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात. त्यांची ही जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते. शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी काही खास शिवजयंती संदेश आणि कोट्स खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जरूर वाचा आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करा.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खास शुभेच्छा !

1. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन! जय भवानी, जय शिवाजी !

2. प्रत्येक संकटाला तोंड दिले, प्रत्येक युद्ध जिंकले, मराठा साम्राज्याचा तो सूर्य चिरंजीव हो, छत्रपती शिवाजी महाराज! शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. शौर्य, धोरण आणि न्याय यांच्या अद्भुत संगमाला नमन ! शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4. स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवणाऱ्या त्या शूर योद्ध्याला शतशः प्रणाम! शिवरायांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. हिंदवी स्वराज्याचे निर्माते, मुघल साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे! जय शिवाजी!

6. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नसून त्यांच्या विचारांना अंगीकारण्याची संधी आहे. जय भवानी, जय शिवाजी!

7. ज्यांनी कधीही भीती बाळगली नाही, ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या रक्षणासाठी तलवार हाती घेतली त्या शूर शिवाजी महाराजांना शतशः प्रणाम!

8. स्वराज्याची मशाल पेटवून अन्यायाविरुद्ध उभे राहिलेल्या, प्रत्येक भारतीयाचा अभिमान असलेल्या शिवाजी महाराजांना वंदन !

9. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपल्याला धैर्य, शौर्य आणि देशभक्ती शिकवते. जाणत्या राजाला कोटी कोटी प्रणाम!

10. जे हक्कासाठी लढले, अन्यायापुढे झुकले नाही ते होते आपले छत्रपती शिवाजी महाराज! त्यांच्या जयंतीनिमित्त अभिमानाने आपले शीर उंच करा!

11. शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे! जय शिवराय!!

12. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो “आपला शिवबा” होता. जय शिवराय !!

13. भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवराय!!

14. शत्रूंसाठी वीज आणि प्रियजनांसाठी सावली असलेल्या अशा महान वीर छत्रपती शिवाजी महाराजांना मन:पूर्वक वंदन !