म्हणून काँग्रेसला मळमळ, जे आजीला जमलं नाही ते आता.., फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता देशभरात भाजपच्या वतीने लोकतंत्र बचाव , अराजकता हटाव पदयात्रा काढण्यात येत आहे. आज नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

म्हणून काँग्रेसला मळमळ, जे आजीला जमलं नाही ते आता.., फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 6:09 PM

विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता देशभरात भाजपच्या वतीने लोकतंत्र बचाव , अराजकता हटाव पदयात्रा काढण्यात येत आहे. आज नागपूरमध्ये या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  या पदयात्रेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती होती. लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव अशी ही पदयात्रा आहे. ही लढाई देशाच्या संविधानाकरता आहे, जे षडयंत्र सुरू आहे, ते चांगलं नाही. हे म्हणतात आम्हाला रेजिम चेंज करायची आहे,  म्हणजे सत्ता परिवर्तन करण्यामागे डावी व्यवस्था देशात आणणं हा विरोधकांचा उद्देश आहे, असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

Loading...

लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव अशी ही पदयात्रा आहे. ही लढाई देशाच्या संविधानाकरता आहे, जे षडयंत्र सुरू आहे, ते चांगलं नाही. आम्ही रस्त्यावर उतरून देखील लढाई लढण्यास तयार आहोत.  तुम्ही हजार असाल तर आम्ही लाख येऊ.  हे म्हणतात आम्हाला रेजिम चेंज करायची आहे,  म्हणजे सत्ता परिवर्तन करण्यामागे डावी व्यवस्था देशात आणणं हा विरोधकांचा उद्देश आहे. त्यांना भारतात बांगलादेश , नेपाळ सारखी स्थिती निर्माण करायची आहे.  एकीकडे हातात संविधान आणि दुसरीकडे संविधान विरोधी काम हे करत आहेत, असा हल्लाबोल यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

त्यांनी  1975 साली यांनी देशाचं संविधान बदलण्याचं काम केलं होतं, मूलभूत अधिकार देण्याचं काम संविधानाने केलं आहे. संविधानाची मोडतोड करणारे काँग्रेस आहे, राहुल गांधी यांना सांगतो जे तुमच्या आजीला जमलं नाही ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात. ज्या बांगलादेशी लोकांच्या भरोशावर हे निवडून येते होते, ते आता इथून पुढे मतदान करणार नाहीत, म्हणून यांना मळमळ होत आहे, पण आम्ही इथे एकाही बांगलादेशी नागरिकांना राहू देणार नाही, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us